SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘5G’ सेवा सुरु करण्यात ‘ही’ कंपनी आघाडीवर, जबरदस्त ‘नेट स्पीड’ मिळणार…

गेल्या काही दिवसांपासून भारतात 5G सेवेची जोरदार चर्चा आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर इंटरनेटचा वेग 10 पट वाढणार असल्याचा दावा केला जात आहे.. त्यामुळे मोबाईलधारकांना त्याची प्रतीक्षा लागलेली असतानाच, टेलिकाॅम कंपन्याही ही सेवा लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे..

5G स्पेक्ट्रमसाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया झाली.. त्यात सुनील मित्तल यांच्या नेतृत्वातील ‘भारती एअरटेल’ने 43,084 कोटी रुपयांचे ‘स्पेक्ट्रम’ खरेदी केले आहेत. ‘एअरटेल’ने 900, 1800, 2100, 3300 मेगाहर्ट्ज, तसेच 26 गिगा हर्ट्ज बँडमध्ये 19,867.8 मेगा हर्ट्ज स्पेक्ट्रम मिळवले आहेत.

Advertisement

ऑगस्टमध्येच सुरु होणार

आता ‘एअरटेल’ कंपनीकडून लवकरात लवकर ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यातच (ऑगस्ट 2022) ‘एअरटेल’ची 5G सेवा सुरु होणार आहे.. त्यासाठी ‘एअरटेल’ कंपनीने ‘एरिक्सन’, ‘नोकिया’, ‘सॅमसंग’सोबत आज करार केला. त्याअंतर्गत या महिन्यात उपकरणे तैनात केले जाणार असल्याचे समजते..

Advertisement

‘भारती एअरटेल’ने (Bharti Airtel) हैदराबादमध्ये 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीत 1 जीबी फाईल फक्त 30 सेकंदात ‘डाऊनलोड’ झाली. तसेच ‘एअरटेल’ने ‘नोकिया’ (Nokia) सोबत कोलकाता शहराबाहेर 700 MHz स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5G चाचणी केली.. ग्रामीण भागात करण्यात आलेली ही पहिली 5G चाचणी होती.

‘एअरटेल’ची 5G सेवा ऑगस्टमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. नेटवर्क करारांना अंतिम रूप दिले आहे.. आपल्या ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करणार असल्याचे ‘एअरटेल’चे ‘सीईओ’ गोपाल विट्टल म्हणाले.

Advertisement

दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील 13 शहरांमध्ये सुरुवातीला 5G नेटवर्क सुरु होणार असल्याचे समजते.. त्यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई व पुणे या शहरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement