SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टाटा’ची नवीन कार लाॅंच, स्वस्तात मस्त नि दमदार फीचर्स..

तुमचं कार खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.. भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैकी एक असणाऱ्या ‘टाटा मोटर्स’कडून कारचे नवे माॅडेल लाॅंच करण्यात आले आहे.. सर्वसामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून ‘टाटा’कडून ही कार सादर करण्यात आली आहे..

गेल्या वर्षी ‘टाटा मोटर्स’ने (Tata Motors) तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ‘टियागो एनआरजी’ (Tata Tiago NRG) ही हॅचबॅक कार लाॅंच केली होती. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.. त्यामुळे ‘टाटा’ने या कारचे नवीन ‘एक्सटी’ (Tata Tiago NRG XT) व्हेरिएंट यंदा लॉंच केलंय.

Advertisement

‘टियागो एनआरजी’ कारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘टाटा’ कंपनीने हे नवीन व्हेरिएंट सादर केलंय. या कारची एक्स-शोरुम किंमत फक्त 6.42 लाखांपासून सुरुवात होते..’टाटा’ने फेसलिफ्ट ‘टियागो एनआरजी’ला ऑगस्ट-2021 मध्ये पुन्हा लाँच केले होते. ते फक्त लोडेड ‘एक्सझेड’ (XZ) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होते. आता 40 हजार रुपयांनी कमी व्हर्जन बाजारात आणले आहे..

नव्या कारचे फीचर्स…

Advertisement
  • ‘टाटा’ कंपनीच्या नवीन ‘एक्सटी’ व्हेरिएंटमध्ये 14 इंच हायपर स्टाईल व्हील, 3.5-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फ्रंट फॉग लॅम्प अशी फीचर्स आहेत.
  • ‘रेग्युलर’ टियागोच्या ‘एक्सटी’ व्हेरिएंटलाही 14 इंच हायपर स्टाईल व्हील, हाइट-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट व रिअर पार्सल शेल्फसह अपडेट करण्यात आलं आहे.
  • आपल्या साइड क्लॅडिंग, ब्लॅक रुफ रेल, चारकोल ब्लॅक इंटीरिअर कलर स्कीम व 181 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह अधिक तरुणांना आकर्षित करेल.
  • ही कार साधारण ‘टियागो’पेक्षा 37 मिमी लांब आहे. कारचे मागील-पुढील बंपर वेगळे दिसतात
  • इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये 1.2 लिटर, नॅच्युरली एस्पिरेटेड, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलेले आहे, जे 84 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअलसह 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे.
  • या कारमध्ये ब्लॅक-आउट बी-पिलर, रिअर पार्सल शेल्फ, पॅसेंजरच्या बाजूला व्हॅनिटी मिरर आहेत.

गेल्या वर्षी ‘टियागो एनआरजी’ ही कार लाॅंच केली होती. नंतर ऑगस्ट-2021 मध्ये ती अपडेट करण्यात आली. नेहमीच्या ‘टियागो’च्या तुलनेत या कारमध्ये शार्प हेडलॅम्प व वेगळी डिझाइन केलेली ग्रिल पाहायला मिळत असल्याने तरुणांच्या पसंतीस उतरली आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement