SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजना : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, ‘या’ तारखेला येणार 12वा हप्ता..?

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती.. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात.. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत..

केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करीत असते.. देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मे रोजी पीएम किसान योजनेचा (PM Kisan scheme) 11वा हप्ता वर्ग करण्यात आला होता. मात्र, दोन महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे पैसे मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..

Advertisement

अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. लवकरच केंद्र सरकारतर्फे पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी केला जाणार आहे.. मात्र, ज्या शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचेच 2,000 रुपये मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचे पैसे एकाच वेळी देण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे प्रत्येकी 2 हजार, असे एकूण 4000 रुपये एकदम मिळणार असल्याचे सांगण्यात आले..

बारावा हप्ता कधी येणार…?

Advertisement

सध्या शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.. त्यावेळी ज्यांना 11व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नसतील, त्यांना एकाच वेळी 4000 रुपये दिले जाणार आहेत..

दरम्यान, अनेक बाेगस लाेकांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.. त्यातून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालीय.. अशा शेतकऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या पैशांची वसूली सुरु करण्यात आली आहे.. अशा लोकांना पैसे परत करण्याबाबत नोटिसा बजावल्या जात आहेत. पैसे परत न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement