SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

झेडपी, महापालिका सदस्य संख्येत मोठे बदल, शिंदे सरकारचे 10 महत्वपूर्ण निर्णय..!!

महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाकाच लावला आहे.. तीच मालिका आजही (ता. 3) कायम राहिली..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली.. त्यात  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेच्या निर्णयासह महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आले.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

शिंदे सरकारचे महत्वपूर्ण निर्णय..

महापालिका सदस्य संख्येत सुधारणा

Advertisement

राज्यातील महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील सध्याच्या 236 ऐवजी 227 सदस्य संख्या होईल. इतर महापालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या असणार आहे.. ती खालीलप्रमाणे :

  • 3 ते 6 लाख लोकसंख्या – किमान सदस्य संख्या 65, कमाल 85
  • 6 ते 12 लाख – किमान 85, कमाल – 115
  • 12 ते 24 लाख- किमान 115, कमाल – 151
  • 24 ते 30 लाख – किमान 151, कमाल- 161
  • 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या -किमान 161, कमाल 175

झेडपी सदस्य संख्येत बदल

Advertisement

जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50, तर कमाल 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या किमान 55, तर कमाल 85 सदस्य संख्या आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या घटत चालल्याने सदस्य संख्या कमी करण्यात आली आहे..

अन्य महत्वाचे निर्णय

Advertisement

▪️ भिवंडी-कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणासाठी 561 कोटी 85 लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येईल.

▪️ यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या 565 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Advertisement

▪️ जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 187 कोटी 4 लाख रुपयांच्या कामांना मान्यता.

▪️ ‘जीएसटी’ विवरण पत्रके भरताना व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता

Advertisement

▪️ राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी 4350 पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन 443 नियमित पदे निर्मिती करण्यात येतील. त्यात सह परिवहन आयुक्त संवर्गातील 5 नियमित पदांचा समावेश

▪️ नवीन महाविद्यालयांसाठी इरादापत्रांची मुदत १७ ऑगस्टपर्यंत, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणेला मान्यता.

Advertisement

▪️ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या 3 नियमित व 17 कंत्राटी पदांना मान्यता

▪️ माहिती व जनसंपर्क मधील दोन लिपिकांच्या सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून नियमित.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement