SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 3 ऑगस्ट 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 3 ऑगस्ट 2022

✒️ गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडीसाठी मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे द्या, ध्वनीमर्यादेत अतिरिक्त 1 दिवस शिथिलता द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

✒️ राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, घोषणाबाजी करत गाडीची काच फोडली; मी सुखरूप – सामंत

✒️ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला काल दिवसभरात 3 पदके; टेबल टेनिसमध्ये पुरुष आणि महिला लॉन बॉलने जिंकले सुवर्ण, वेटलिफ्टिंगमध्ये विकासला रौप्यपदक

✒️ आंध्र प्रदेशात केमिकल कंपनीत गॅस गळती, 50 महिलांना तातडीने रूग्णालयात केलं दाखल; अनकापल्ले जिल्ह्यात घडली घटना

✒️ मोदी सरकारच्या रडारवर चीनमधील काही कंपन्या, करचुकवेगिरीच्या आरोपात Oppo, Vivo India आणि Xiaomi ला पाठवण्यात आल्या नोटीस

✒️ देशात मंकीपॉक्सचे 8 रुग्ण, एकाचा मृत्यू: एकट्या केरळमध्ये 5 रुग्ण; दिल्लीत एक नवीन रुग्ण एकूण 3 जणांना लागण, त्यापैकी दोन नायजेरियन

✒️ GST संकलन: जुलैमध्ये कर संकलनात 1.49 लाख कोटी रुपये, वार्षिक आधारावर पाहिल्यास गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 28% वाढले; करचोरीही घटली

✒️ एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा वादात: लाऊडस्पीकरवरून रात्री 10 नंतर भाषण, क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार, शिवसेनेचाही आक्षेप

✒️ राज्यातील सत्ता संघर्षावर आज फैसला? राज्यातील राजकीय पेचावर आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाकडून मोठा निर्णय येण्याची शक्यता, एकूण 4 याचिकांवर सुनावणी

✒️ गुजरात विधानसभा निवडणूक: आम आदमी पक्षाने प्रसिद्ध केली उमेदवारांची यादी, पहिल्या यादीत 10 जणांना संधी; जे बोलत आहे ते करून दाखवेन – केजरीवाल
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement