SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, महिला व बाल विकास विभागात भरती..

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागात लवकरच काही जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागात विविध पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा –  195

या पदांसाठी भरती

Advertisement
 • जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer)
 • संरक्षण अधिकारी (Protection Officer)
 • कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer)
 • समुपदेशक (Counsellor)
 • सामाजिक कार्यकर्ता (Social Worker)
 • लेखापाल (Accountant)
 • डेटा विश्लेषक (Data Analyst)
 • सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator)
 • आउटरीच वर्कर (Outreach Worker)

शैक्षणिक पात्रता

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व संरक्षण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक.

Advertisement

कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी.
समुपदेशक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशनमध्ये पदवीधर किंवा पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग अँड कम्युनिकेशनपर्यंत शिक्षण.

सामाजिक कार्यकर्ता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/सामाजिक विज्ञान या विषयात प्राधान्याने पदवीपर्यंत शिक्षण.
लेखापाल – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य/गणित विषयातील पदवीधर.

Advertisement

डेटा विश्लेषक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / संगणक (BCA) मध्ये पदवी.
सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर – संगणकातील डिप्लोमा / प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड / समकक्ष मंडळातून 12 वी उत्तीर्ण.
आउटरीच वर्कर – मान्यताप्राप्त बोर्ड/ समकक्ष मंडळातून 12वी उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (राखीव प्रवर्गासाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.wcdcommpune.com/dcpu/

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement