SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात पुन्हा धो-धो? ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जाहीर..

राज्यात बहुतांश ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात व त्यापूर्वी मुसळधार पाऊस तर कुठे-कुठे सततच्या रिपरिप पावसाने नद्या दुथडी भरून वाहत होत्या. राज्यातील काही धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सोडल्याने गडचिरोली, कोकण, नांदेड सारख्या व इतर ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं ऐकलं असेलच.

आता मागील साधारणतः आठवडाभरात पावसाचा वेग मंदावला आणि ऊन सावल्यांचा खेळ काही ठिकाणी सुरू झाला. पण आता राज्यात काही जिल्ह्यांत पुन्हा जोरदार पावसाचा इशारा (Weather & Rain Update) हवामान विभागाचे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. राज्यात काही ठिकाणी जोरदार तर कोकणात 4 ऑगस्ट व 5 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Advertisement

पावसाचा यलो अलर्ट कुठे-कुठे..?

2 ऑगस्ट : आज (2 ऑगस्ट) वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि अमरावती या ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे. पावसाची शक्यता वर्तवल्याने या भागाला यलो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर झाला आहे.

Advertisement

3 ऑगस्ट – दिनांक 3 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, लातूर, नांदेड, बीड, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली या भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाट देखील होऊन पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी हवामान विभागाकडून या भागाला यलो अलर्ट देण्यात आलाय.

4 ऑगस्ट – तर दिनांक 4 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड आणि जालना या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस (Weather Update) होणार असल्याची शक्यता सांगितली आहे. हवामान खात्याकडून दिनांक 4 ऑगस्टला पावसाची शक्यता वर्तवल्याने तसा यलो अलर्ट या भागांना देण्यात आलाय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement