SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला 25 लाख रुपयांच्या लॉटरीचा मेसेज आलाय? मग वाचा..

कॉलद्वारे किंवा आपल्यापैकी अनेकांना काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) ला लॉटरीचे मेसेज येत असतील. काही फसवणूक करणारे लोक या पद्धतीचा वापर करतात. जेणेकरून काही तांत्रिक बाबी माहीत नसणारे अँड्रॉइड मोबाईल युजर्स या आमिषाला बळी पडतात. मग आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व काही डेटावर त्या सायबर चोरांचे कंट्रोल राहते.

मागील काही महिन्यांपासून कुणाला Vivo IPL च्या नावाने किंवा सध्या KBC म्हणजेच कौन बनेगा करोडपती सीझन चालू आहे यामुळे KBC कडून तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे किंवा तुम्ही विनर झाला आहात आणि तुम्ही अमुकतमुक नंबरवर कॉल करून प्रोसेस जाणून घ्या आणि आपले बक्षिस मिळवा. असं एका मेसेज किंवा व्हिडीओद्वारे सांगितलं जातं.

Advertisement

पाकिस्तानमधून येतोय तुम्हाला कॉल, मेसेज?

महत्वाचे म्हणजे +91 हा भारताचा कोड आहे आणि या लोकांनी +92 सुरुवात असणाऱ्या नंबरवरून फसवणूक केल्याच्या अनेक घटना नेहमी घडत आहेत. हा +92 हा पाकिस्तानचा कोड आहे. बहुतेकांना माहीत असून देखील या 25 लाख रुपयांच्या जाळ्यात अडकतात माणूस विचार करत नाही आणि मग तक्रारीसाठी पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी यांसह इतर आणखी नवीन पद्धतींचा अवलंब असतात. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना आमिष दाखवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, अभिनेते अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती यांचाही व्हिडिओमध्ये पोस्टर दाखवून वापर केला आहे.

Advertisement

पाकिस्तानी नंबरवरून कॉल किंवा मेसेज (Massage) करणं ही सर्वात जुनी आणि चोरट्यांमधली लोकप्रिय पद्धत आहे. हे भामटे 25 लाख रुपयांची लॉटरी संबंधित माहीती देणारा व्हॉट्सअ‍ॅप संदेश पाठवतात. वापरकर्त्यांना फसवण्यासाठी ऑडिओ/व्हिडीओ मेसेजमध्ये सांगतात की व्हॉट्सअ‍ॅप लॉटरी जिंकल्याचा मेसेज पाठवला आहे. लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी काही प्रोसेस आहे ती देखील ते सांगतात. त्याप्रमाणे तूम्ही ती पद्धत केली तर तुमचं बँक अकाऊंट रिकामं झाल्याशिवाय राहत नाही किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असणारे फोटो, व्हिडीओ, महत्वाचा डेटा हॅक होतो.

काय काळजी घ्यावी..?

Advertisement

▪️ घरबसल्या तुम्हाला 25 लाख लॉटरी कोणी देणार नाही, म्हणून असे मेसेज येणारे नंबर ब्लॉक करून व्हाट्सअपला Report करा.

▪️ लॉटरीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँक अकाऊंट नंबर, ओटीपी मागितला तर देऊ नका. योग्य खात्री करा.

Advertisement

▪️संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. संशयास्पद नंबर ब्लॉक करा. व्हिडीओ मध्ये असणारा आवाज तुम्हाला आणि भाषा प्रोफेशनल वाटणार नाही.

▪️कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास, सायबर क्राईम पोर्टलवर त्वरित तक्रार करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement