SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला नागपंचमी सणाचे महत्व, कथा माहीती आहे का..?

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण. हा सण तसे पाहिले तर सर्वत्र साजरा होतो. आजच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. काही भागांत चिखलाचा नागदेवता करतात. तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात. कुठे वारुळाची पूजा तर कुठे मंदिरात जाऊन पूजा करतात. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो.

आजच्या दिवशी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. अनेक सण-उत्सव आपल्या जगण्याचं अविभाज्य अंग असतात. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या कामी येणाऱ्‍या सर्व लोकांची जशी आपण कृतज्ञता व्यक्त करतो तशीच आज ही कृतज्ञता आपण नागदेवतेची व्यक्त करत असतो. अनेक शास्त्रीय, नैसर्गिक कारणे आहेत ज्यामध्ये धार्मिक पौराणिक कारणे बरीच सांगितली जातात. वेगवेगळ्या पौराणिक कथा देखील आहेत. तर अनेक दंतकथा आख्यायिका आहेत. त्यापैकी एक घ्या जाणून..

Advertisement

ऐकिवात कथेनुसार, एक शेतकरी श्रावण महिन्यात नागपंचमीच्या शेत नांगरायला सुरुवात करतो. त्या शेतात कुठेतरी नागाचे एक वारूळ असते. एका नागिनीने नुकत्याच आपल्या पिल्लांना जन्म दिलेला असतो. पिल्ले जन्माला घातल्याने ती नागीन त्यांच्यासाठी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते तोच दुसरीकडे शेत नांगरत असताना नांगराचा फाळ चुकून लागून ही नागिणीची पिल्ले मरतात. मग नागिण परतल्यानंतर पिल्लांना मेलेले पाहून हा सर्व प्रकार पाहून तिला खूप राग येतो.

मग नागीण शेतकऱ्याचा बदला घेण्याचं ठरवते. मग नागिण शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करण्यासाठी ती शेतकऱ्याच्या घरात येऊन शेतकरी त्याची बायको आणि दोन्ही मुलांसह सर्वांना दंश करून मारून टाकते. तिथे तिला माहीत पडते याची मुलगी दुसऱ्या गावाला आहे. ती तिला मारण्यासाठी तिथे पोहोचते.

Advertisement

पण तिथे ती मुलगी चंदनगंधाने नागाच्या चित्राची पूजा करताना तिला दिसते. या मुलीने मनोभावे पूजा करून नागदेवतेला दूध-लाह्यांचा नैवेद्य देखील दाखवला. हे सगळं बघून नागिणीला तिच्या भक्तीनंतर दया आली. नागिणीचा राग शांत झाला आणि त्या मुलीने नैवेद्य म्हणून ठेवलेले दूध तिने पिले आणि मुलीला क्षमा केलं. यासोबतच तिच्या वडील, आई आणि भावंडाना देखील जिवंत केलं. त्यानंतर शेतकरी त्या नागिनीची क्षमा मागतो आणि नागांची पूजा करतो. यानंतर अख्ख्या गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरते आणि इतर लोक देखील नागपंचमीची पूजा करायला सुरुवात करतात. या कथेमागे एवढंच सार आहे की आपण नागपंचमी सण करतो पण नागाविषयी देखील कृतज्ञता आज व्यक्त करायला हवी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement