SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ठार, अमेरिकेने केला ड्रोन हल्ला..

अमेरिकेने (US) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत अल कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीला (Ayman al-Zawahiri) ठार केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्याला ठार केल्याचा दावा खुद्द अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, “अमेरिकेने काबूलमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदा चीफ अयमान अल-जवाहिरीला (Ayman al Zawahiri) ठार केलं गेलं आहे. आताशी आपल्याला खरा न्याय मिळाला आहे. आता हा मास्टरमाईंड दहशतवादी जिवंत नाहीय”, अशी त्यांनी माहिती दिली.

Advertisement

एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरीने काबूलमधील (Kabul) एका सेफहाऊसमध्ये आश्रय घेतला होता. यातच दोन हेलफायर मिसाईलने केलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला. 31 जुलै रोजी रात्री 9:48 वाजता त्याचा मृत्यू झाला. अल-जवाहिरीवर अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती.

ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता. अमेरिकेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिटलिस्टवर असणारा जवाहिरी हा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्या दहशतवादी घटनेत सुमारे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर तो अल-कायदाचा प्रमुख झाला. न्यूयॉर्क टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएन अशा वृत्तपत्रांनी अज्ञात स्त्रोतांचा हवाला देऊन त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement