SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आशिया चषक-2022’चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाक ‘या’ तारखेला भिडणार…

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. ‘आशियाई क्रिकेट कौन्सिल’चे (ACC) चेअरमन जय शाह यांनी आज (ता. 2) ‘आशिया कप-2022’च्या वेळापत्रकाची घोषणा केली.. यंदा ही स्पर्धा ‘युएई’मध्ये होणार असून, 27 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.. फायनल सामना 11 सप्टेंबरला होणार असल्याचे शाह यांनी सांगितले..

आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश व अफगाणिस्तान या 5 देशांमध्ये मैदानात जोरदार घमासान होणार आहे.. मात्र, चाहत्यांना सर्वाधिक उत्सुकता लागली आहे, ती भारत-पाक सामन्याची… या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील ‘हाय व्होल्टेट’ सामना 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे..

Advertisement

Advertisement

आशिया कपमधील पहिला सामना 27 ऑगस्टला श्रीलंका व अफगाणिस्तान संघात होईल. त्यानंतर 28 ऑगस्टला रात्री 8 वाजता भारत-पाकमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. तर 11 सप्टेंबरला आशिया कपमधील फायनल मॅच खेळवली जाणार आहे.

‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी ‘आशिया कप’चे वेळापत्रक ट्विटर हँडलवर शेअर केले. त्यात त्यांनी असं म्हटलंय, की “अखेर प्रतीक्षा संपली, कारण आशियाई वर्चस्वासाठी 27 ऑगस्टपासून सामने सुरू होत आहेत. 11 सप्टेंबरला फायनल सामना खेळवला जाईल. टी-20 वर्ल्डकप आधी आशिया कपचा 15वा हंगाम महत्त्वपूर्ण ठरणार आहे..”

Advertisement

सामन्यांचे वेळापत्रक..

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

 

Advertisement

खरं तर ‘आशिया कप-2022’ याआधी श्रीलंकेत खेळवला जाणार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेथील परिस्थिती मोठ्या प्रमाणात चिघळली आहे.. त्यामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यासा श्रीलंकेने असमर्थता दर्शवली होती. अखेर ही स्पर्धा ‘यूएई’मध्ये हलविण्यात आली. स्पर्धेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement