SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे दोन सामने रद्द होणार..? ‘या’ कारणामुळे मॅचबाबत अनिश्चितता…

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे.. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला असून, दुसरा सामना आज (ता. 1) सायंकाळी खेळवला जाणार आहे.. मात्र, त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.. (Ind vs WI)

वेस्ट इंडिजविरुद्ध होत असलेल्या 5 सामन्यांपैकी (T-20 series) शेवटचे दोन सामने अमेरिकेत होणार आहेत. मात्र, या 2 सामन्यांवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे 6 व 7 ऑगस्ट रोजी हे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, भारत व वेस्ट इंडिज संघातील अनेक सदस्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे हे सामने अडचणीत आले आहेत..

Advertisement

अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अखेरपर्यंत जर व्हिसा मिळाला नाही, तर हे अखेरचे दोन सामने वेस्ट इंडिजमध्येही खेळवले जाऊ शकतात.. कॅरेबियन क्रिकेट बोर्ड त्यांच्याच भूमीवर हे सामने खेळवण्याचा विचार करीत असल्याची माहिती मिळाली..

भारतीय संघ आघाडीवर

Advertisement

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला सामना तब्बल 68 धावांनी जिंकला.. त्यानंतर या मालिकेतील दुसरा आज ‘सेंट किट्स’ येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. दुसरीकडे, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील विंडीजचा संघ मालिकेत पुनरागमनाचा प्रयत्न करील.

पहिल्या सामन्यात रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव ओपनिंगला आला होता. मात्र, सलामीला सूर्यकुमारला यश मिळू शकलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला खेळवले.. मात्र, तोही अपयशी ठरला. त्यामुळे त्यांच्या जागी दीपक हुड्डाला संधी मिळण्याची शक्यता आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement