SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृषभ (Taurus): बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील गोष्टींबाबत फार दक्ष राहाल. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

मिथुन (Gemini) : स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.

कर्क (Cancer) : योग्य पथ्ये पाळावीत. पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्‍यांच्या विरोधात कामे करू नका. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

Advertisementसिंह (Leo) : कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

कन्या (Virgo) : आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

तुळ (Libra) : इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. भागीदारीत अधिक लक्ष घाला. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष नको. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

Advertisementधनु (Sagittarius) : कामातील सक्रियता वाढवावी लागेल. गरज भासल्यास अधिकार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. एकमेकांचे सुख-दू:ख नीट जाणून घ्या. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तिला आकर्षित करू शकाल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कुंभ (Aquarious) : मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

मीन (Pisces) : आर्थिक चढ-उतार लक्षात घ्यावेत. नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

Advertisement