SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एमपीएससी’कडून स्पर्धापरीक्षा पद्धतीत मोठे बदल, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’मार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा घेतली जाते.. मात्र, लोकसेवा आयोगाने आता त्यात मोठा बदल केला असून, स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

भरती प्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, त्याचा उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, त्यातून भरती प्रक्रियेस होणारा विलंब व स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता राखण्यासाठी ‘एमपीएससी’कडून (MPSC exam) परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

काय बदल झाला..?

‘एमपीएससी’कडून स्पर्धा परीक्षेत करण्यात आलेल्या बदलांबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.. त्यानुसार आता ‘क्लास -1’ व ‘क्लास-2’ पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा होईल. तसेच सेवा गट ‘ब’ व ‘क’साठी एकच पूर्वपरीक्षा असेल.. पुढच्या वर्षीपासून होणाऱ्या परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे..

Advertisement

▪️ सर्व राजपत्रित गट-‘अ’ व गट- ‘ब’ संवर्गाकरीता यापुढे पारंपरिक / वर्णात्मक स्वरुपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

▪️ राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-‘अ’ व गट- ‘ब’ संवर्गातील पदभरतीकरीता ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल.

Advertisement

▪️ सर्व राजपत्रित गट-‘अ’ व गट-‘ब’ संवर्गाकरीता यापुढे ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षे’द्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

▪️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेकरीता उमेदवारांकडून अर्ज घेताना विज्ञापित सर्व संवर्गाकरीता अर्हतेवर आधारीत संवर्गाचा विकल्प घेण्यात येईल. तसेच संबंधित संवर्गाकरिता उमेदवाराने दिलेला विकल्प हा संबंधित संवर्गातील पदभरतीकरीता अर्ज समजण्यात येईल.. तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरीता पूर्व परीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल.

Advertisement

▪️ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

▪️ सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तसेच सदर संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व अराजपत्रित गट-ब व गट-क संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement