SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मंकीपॉक्स व्हायरसचा पहिला बळी, भारतातील पहिलेच प्रकरण..

केरळमध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणं असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सारखी लक्षणं होती. भारतात आतापर्यंत नोंदवलेल्या चार मंकीपॉक्स प्रकरणांपैकी तीन केरळमधील आहेत.

भारतात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केरळमध्ये मंकिपॉक्सचा पहिला रूग्ण आढळला आला. केरळमध्ये आजपर्यंत तीन रूग्ण बाधित झाल्याचं आढळलं आहेत. भारतातील मंकिपॉक्सबाधित रुग्णाचा हा पहिला बळी असून, आफ्रिेकेबाहेरचा चौथा बळी आहे.

Advertisement

केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज (Kerala Health Minister Veena George) यांनी सांगितलं की, युएईहून परतलेल्या या 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणे दिसल्याचं समजतंय. या रुग्णाचा मृत्यू मंकीपॉक्समुळे झाल्याचा संशय आहे. त्याने तिथे मंकीपॉक्सची केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, ही गोष्ट त्याने कुटुंबापासून लपवली होती. आता या रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी शनिवारी तपासणी अहवाल आमच्याकडे सोपवला, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

केरळमधील पुन्नियूर, त्रिशूर येथील रहिवाशी असेलला या 22 वर्षीय तरूणाला युएई मध्येच मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सदस्यांसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली गेली आहे.

Advertisement

या मृत रुग्णाच्या स्वॅबचे नमुने शनिवारी अलाप्पुझा येथील ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एनआयव्ही रिपोर्टची प्रतीक्षा असताना राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जे लोक मृत व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात होते त्यांना स्वतःला विलगीकरणात ठेवण्यास सांगितलं आहे. याशिवाय कोरोनाविषयक आवश्यक ती खबरदारी घेत राहावी, म्हणजे यामुळे कोरोना रुग्णांची देखील संख्या वाढणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement