SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सर्वांत स्वस्त इंटरनेट डेटा, ‘येथे’ मोजावे लागतात फक्त 3 रुपये..

भारतात 5G चे काम अंतिम टप्प्यात आहे. अखेरच्या टप्प्यात चाचणीचे काम सुरू असून 5G स्पेक्ट्रमचा लिलावही सुरू आहे. सध्या 4G चे इंटरनेट डेटाचा दर पाहता 5G आल्यानंतर त्याचेही दर या दरांच्या आसपास असेल अशी शक्यता आहे. महागाईच्या काळात आपल्याला कॉलिंगसाठी परवडणारे सिम आणि रिचार्ज आपल्याला बजेटनुसार करावे लागते. अशात काही देश अगदी स्वस्तात डेटा देतात. जाणून घेऊ ते देश कोणते..

जगात आपण गूगल सर्च करून जाणून घेतले तर जगात सर्वांत स्वस्त आणि सर्वांत महाग 1GB मोबाईल डेटाची किंमत कोणत्या देशांत किती आहे याविषयीची यादी अलीकडेच ‘वर्ल्डवाइड मोबाईल डेटा प्राइसिंग 2022’ या अहवालात प्रसिद्ध झाली. यामुळे तुम्हाला समजेलच की, भारतात किती स्वस्त किंवा महाग डेटा आहे.

Advertisement

वर्ल्डवाइड मोबाईल डेटा प्राइसिंग 2022 अहवालानुसार..

जगातील 233 देशांमध्ये 1 जीबी डेटाची किंमत किती आहे हे या अहवालात दिले आहे. या रिपोर्टनुसार, इस्त्रायल, इटली, सॅन मरिनो, फिजी आणि भारत हे मोबाईल डेटा सर्वांत स्वस्तात पुरविणारे टॉप-5 देश असून भारत या यादीत 5व्या नंबरवर आहे, तर सर्वात महाग इंटरनेट डेटा जिथे पुरवला जातो असाही एक देश आहे जिथे 1GB मोबाईल डेटासाठी सुमारे 3 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात.

Advertisement

सर्वांत स्वस्त 1GB इंटरनेट डेटा:

▪️ इस्त्रायल 0.04 डॉलर (जवळपास 3 रुपये 17 पैसे)
▪️ इटली 0.12 डॉलर (जवळपास 9 रुपये 50 पैसे)
▪️ सॅन मरिनो 0.14 डॉलर (जवळपास 11 रुपये 09 पैसे)
▪️ फिजी 0.15 डॉलर (जवळपास 11 रुपये 88 पैसे)
▪️ भारत 0.17 डॉलर (जवळपास 13 रुपये 46 पैसे)

Advertisement

सर्वांत महाग 1GB इंटरनेट डेटा:

▪️ सेंट हेलेना 41.06 डॉलर (जवळपास 3251 रुपये)
▪️ फॉकलँड बेटे 38.45 डॉलर (जवळपास 3045 रुपये)
▪️ साओ टोम आणि प्रिन्सिप 29.49 डॉलर (जवळपास 2335 रुपये)
▪️टोकेलाऊ 17.88 डॉलर (जवळपास 1416 रुपये)
▪️ येमेन 16.58 डॉलर (जवळपास 1313 रुपये

Advertisement

▪️ सर्वांत महाग इंटरनेट डेटा दक्षिण अटलांटिक महासागरातील सेंट हेलेना येथे 1 जीबी डेटासाठी 41.06 डॉलर (जवळपास 3251 रुपये) द्यावे लागतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement