SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फायद्याची बातमी..!! ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासह ‘ही’ कामेही होतात..

‘एटीएम’मधून पैसे काढण्याचेच काम होते, असे नाही.. तर इतर अनेक सेवांसाठी तुम्ही ‘एटीएम’ वापरू शकता. त्यात बँक एफडीपासून ते टॅक्स डिपॉझिटपर्यंत अनेक कामे ‘एटीएम’द्वारे करता येतात.. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

‘एटीएम’द्वारे होणारी कामे

Advertisement

पैसे पाठवणे
‘एटीएम’च्या मदतीने तुम्ही दुसऱ्या खात्यात पैसे पाठवू शकता. मात्र, त्यासाठी ऑनलाइन किंवा बॅंक शाखेत जाऊन ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत, त्या खात्याची नोंदणी करावी लागते. ‘एटीएम’मधून (ATM) एका वेळी 40,000 रुपये ट्रान्सफर करता येतात. एका दिवसात असे अनेक व्यवहार केले जाऊ शकतात..

कॅश डिपॉझिट
सर्व बँकांनी ‘एटीएम’सह ‘कॅश डिपॉझिट’ (Cash Deposite) मशीन्स बसवल्या आहेत. त्याद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा करता येतात.. मशीनद्वारे एका वेळी 49,900 रुपये जमा करता येतात. त्यात 2000, 500, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा मशीनमध्ये जमा करण्याची सोय आहे..

Advertisement

विमा पॉलिसीचा हप्ता
‘एटीएम’द्वारे विमा पॉलिसीचा प्रीमियमही भरता येतो.. बँकांनी ‘एलआयसी’ (LIC), ‘एचडीएफसी लाईफ’ (HDFC life) आणि ‘एसबीआय लाइफ’ (SBI life) या विमा कंपन्यांशी करार केलाय. या तिन्ही कंपन्यांचे ग्राहक ‘एटीएम’द्वारे विमाक प्रीमियम भरू शकतात.

‘एटीएम’मध्ये बिल-पे विभागात जा, विमा कंपनीचे नाव निवडा, पॉलिसी क्रमांक टाका. नंतर जन्मतारीख व मोबाइल नंबर भरा. प्रीमियम रक्कम टाकून ‘व्हेरिफिकेशन’ करा. तुमच्या विमा पॉलिसीचे पैसे भरले जातील..

Advertisement

आयकर भरणा
एटीएम कार्डद्वारेही आयकरही (Income tax) भरता येतो.. त्यासाठी वेबसाइट किंवा बॅंक शाखेत नोंदणी करावी लागेल. नंतरच ‘एटीएम’मधून कर भरता येईल. खात्यातून पैसे कापल्यानंतर CIN क्रमांक जारी केला जाईल. कर जमा केल्यानंतर 24 तासांनी बँकेच्या वेबसाइटवरून CIN द्वारे चलन प्रिंट केले जाऊ शकते.

अन्य सुविधा

Advertisement

– एटीएमद्वारे ‘एफडी’ही करता येते.. ‘एटीएम’ स्क्रीनवरील मेन्यूमधून ‘एफडी’ पर्याय निवडून सुरु करु शकता. त्यात एफडी कालावधी, एफडी रक्कम, याचाही पर्याय मिळतो..
– टेलिफोन, वीज, गॅस व इतरही अनेक बिले भरता येतात. बिल भरण्यापूर्वी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर एकदा स्वतःची नोंदणी करावी लागते.

– एटीएमद्वारे तुम्हाला प्रीपेड मोबाईल कनेक्शन रिचार्ज करता येते.
– ‘एसबीआय’ एटीएममध्ये नवीन चेकबूकसाठी अर्ज करता येतो. नंतर चेकबूक तुमच्या बँकेतून नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते..

Advertisement

– मंदिर किंवा धर्मादाय संस्थेला देणगी देण्याचे कामही ‘एसबीआय एटीएम’द्वारे करता येते..
– अनेक खासगी बँका ‘एटीएम’द्वारे प्री-अप्रुव्ह वैयक्तिक कर्ज देतात. त्यासाठी ग्राहकाचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स, खात्यातील शिल्लक, पगाराची रक्कम व क्रेडिट/डेबिट कार्ड परतफेड डिटेल्स पाहिल्या जातात.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement