SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका.

वृषभ (Taurus): तुमच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

Advertisement

मिथुन (Gemini) : सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल. आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.

कर्क (Cancer) : आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील. आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

Advertisement

Advertisement

सिंह (Leo) : जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल. आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

कन्या (Virgo) : कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

Advertisement

तुळ (Libra) : जोखीम सावधगिरीने उचलावी. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

वृश्‍चिक (Scorpio) : रेस-जुगारातून लाभ संभवतो. तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

Advertisement

Advertisement

धनु (Sagittarius) : मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल. आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

मकर (Capricorn) : जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रू पासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल. आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.

Advertisement

कुंभ (Aquarious) : घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल. घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. तुळ व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

मीन (Pisces) : आततायीपणे निर्णय घेऊ नका. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

Advertisement