इंधन दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांत ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे.. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन बड्या बड्या ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करु लागल्या आहेत. सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यात अतिशय कमी किमतीत चांगली रेंज व हायटेक फीचर्स देणाऱ्या ई-स्कूटर (E-scooter) मिळत आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना, भारतीय बाजारात आणखी एक ई-स्कूटर दाखल झालीय.. तुम्ही जर चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही स्कूटर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.. या ई-स्कूटरचे नाव आहे, ‘ओडीसी हाॅक’ (Odysse Hawk)…
‘ओडीसी इलेक्ट्रिक’ (Odysse Electric) या कंपनीची ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. या स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..
ई-स्कूटरची वैशिष्ट्ये
- ‘ओडीसी हाॅक’ ई-स्कूटरमध्ये कंपनीने 2.96 kW क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. त्यास 1800 डब्ल्यू आउटपुट असलेली इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे.
- सामान्य चार्जरने चार्ज करायचे झाल्यास, ही बॅटरी 4 तासांत पूर्ण चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
- एकदा ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 170 किलोमीटरची रेंज देते. या रेंजसह स्कूटरचा सर्वोच्च वेगही मिळतो..
- कंपनीने या स्कूटरच्या पुढच्या चाकामध्ये ‘डिस्क ब्रेक’, तर मागील चाकामध्ये ‘ड्रम ब्रेक’ दिले आहेत. सोबतच ‘अलॉय व्हील्स’ आणि ‘ट्यूबलेस टायर’ही मिळणार आहेत..
अन्य फिचर्स – चार्जिंग पॉइंट, ब्लू-टूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट लॉक, म्युझिक सिस्टम, एलईडी डेल लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो. बॅटरी, इंडिकेटर आदी फीचर्स देण्यात आली आहेत.
किंमत – या स्कूटरची सुरूवातीची किंमत (एक्स-शोरूम) 73,999 रुपये आहे, तसेच टॉप मॉडेल स्कूटरची किंमत 1.15 लाख रुपयांपर्यंत जाते.