SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

छातीत जळजळ होतेय..? ‘हे’ घरगुती उपाय करुन पाहा…

बदलती जीवनशैली, चुकीच्या वेळी खाणे, नको ते खाण्याच्या सवयी, तेलकट-मसालेदार पदार्थ खाणं, आरोग्यासाठी चांगलं नाही.. त्यातून विविध समस्यांना सामाेरे जावे लागू शकते.. त्यापैकीच एक म्हणजे, छातीत जळजळ होणे… सहसा मसालेदार व चमचमीत खाणाऱ्या लोकांना नेहमी या त्रासाला सामोरे जावे लागते.. (Health tips)

अनेक जण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात, तर काही जण स्वतःहून वेगवेगळी औषधे घेतात. मात्र, त्यातूनही आराम मिळत नाही.. या त्रासावर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करू शकता. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

हे उपाय करुन पाहा…

च्युइंगम – छातीत जळजळ होत असल्यास, थोडा वेळ ‘च्युइंगम’ चघळा. त्यामुळे छातीतील जळजळ कमी होऊ शकते. बाजारात अनेक प्रकारचे च्युइंगम उपलब्ध आहेत. फक्त ते ‘शुगर फ्री’ असावे, जेणेकरून दातांसोबतच शरीरही निरोगी राहील.

Advertisement

बेकिंग सोडा – छातीत होणाऱ्या जळजळीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी ‘बेकिंग सोडा’ वापरू शकता. एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात टाकून त्याचे सेवन करा. 10-15 मिनिटांत त्याचे परिणाम दिसू लागतील..

कॅमोमाइल चहा – यात्रावर कॅमोमाईल चहा चांगला उपाय आहे.. हा चहा तुम्ही जेवणानंतर पिऊ शकता. घरीही अगदी सहज बनवू शकता.

Advertisement

सफरचंद – छातीतील जळजळीवर सफरचंद हे अत्यंत गुणकारी फळ आहे. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता जाणवत नाही.. पोटातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. अॅसिडमुळे छातीत जळजळ होते.. अशा वेळी सफरचंद खाल्ल्यास जळजळीची समस्या दूर होते.

बदाम – मूठभर बदाम खाल्ल्यानेही ही समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होते. बदाम खाण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे जेवणानंतर 4-5 बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं..

Advertisement

टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement