SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात, भाजप नेत्याची थेट कोर्टात धाव..

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करीत असताना, बाॅलिवूडच्या फिल्म्सकडे रसिकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.. प्रेक्षकांनी एकप्रकारे बाॅलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकल्याचेच चित्र निर्माण झालेय.. अशात बाॅलिवूड स्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे..

अक्षय कुमार लवकरच ‘राम सेतू’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो कायद्याच्या कचाट्यात सापडलाय. निर्मात्यांनी चित्रपटात वास्तविक मुद्दे चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. तसंच अक्षयच्या भारतीय नागरिकत्वाबाबत सवाल उपस्थित करताना, त्याची देशाबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केलीय..

Advertisement

भाजप नेत्याचे ट्विट

सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत दोन ट्विट केले आहेत. त्यात ते असं म्हणतात, की “मी अक्षय कुमार आणि त्याच्या ‘कर्मा’ मीडियाविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. ते ‘राम सेतू’ चित्रपट चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडत आहेत.”

Advertisement

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय, की “अभिनेता अक्षय कुमार परदेशी नागरिक असल्यास, आम्ही त्याला अटक करण्यास सांगू शकतो.. त्याला दत्तक घेतलेल्या देशातून (भारता) बाहेर काढू शकतो.” चित्रपट निर्मात्यांकडून आपण नुकसान भरपाईचीही मागणी करणार असल्याचं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे..

Advertisement

‘राम सेतू’ हा चित्रपट भारत व श्रीलंका दरम्यान बांधलेल्या ‘राम सेतू’वर आधारित आहे. त्यात अक्षय कुमारने पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारलीय, जो या घटनेची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त अभिनेत्री नुसरत भरूचा व जॅकलिन फर्नांडिस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचं शूटिंग अयोध्या व रामेश्वरमसह अनेक पौराणिक ठिकाणी झालंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. हा चित्रपट सुरुवातीपासूनच नावामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे ‘राम सेतू’ची प्रतिमा खराब झाल्याचा आरोपही स्वामींनी केला आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement