SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आर्थिक मानात सुधारणा होईल. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो. व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल. आरोग्य निरोगी राहिल. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus): आंतरिक इच्छा पूर्ण होतील. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घ्या. लव लाईफ उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : कामात फार कोणावरही विसंबून राहू नका. कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. लव लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दाम्पत्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. आई-वडिलांकडून साथ लाभेल. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

कर्क (Cancer) : रागाला आवर घालावा लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका. आय.टी. आणि मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी दिवस संघर्षमय असेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. लव लाईफ उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. वैचारीकदृष्ट्या गोष्टींमुळे मनात चिंता सतावत राहील. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

Advertisement

सिंह (Leo) : कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. व्यापारातील महत्त्वाच्या कामात व्यस्त व्हाल. गृहस्थजीवनात सुख – शांतता राहील. काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल.

कन्या (Virgo) : जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा. वायफळ खर्च करणं टाळा. समाजात मान-सन्मान मिळेल. बॅंकिंग आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

Advertisement

तुळ (Libra) : अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मित्र-मैत्रिणींची भेट होईल. विवाहीत जीवनात आनंद मिळेल. मन स्थिर राहील. लेखन आणि साहित्यिक क्षेत्रात तुमची गोडी निर्माण होईल. आरोग्य निरोगी राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

वृश्‍चिक (Scorpio) : शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत. कामाधंद्यात वाढ होईल. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यामुळे, तुमचे मन प्रसन्न राहील. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

Advertisement

धनु (Sagittarius) : मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. कमिशन मधून चांगला मोबदला मिळेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्‍यांशी सुसंवाद साधावा. आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा.

मकर (Capricorn) : आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल. नवीन कार्याची सुरूवात करू शकता. प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

कुंभ (Aquarious) : जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल. घरातील महत्त्वाच्या कामात लक्ष द्या. लव लाईफ चांगली राहील. धन आगमन होईल. आरोग्य निरोगी राहील. परिश्रम केल्यानंतर तुमच्या कार्यात यश येईल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

मीन (Pisces) : मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा.

Advertisement