SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा, ‘हा’ खेळाडू असणार कॅप्टन…!!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.. त्यासाठी ‘बीसीसीआय’च्या निवड समितीने शनिवारी (ता. 30) टीम इंडियाची घोषणा केली.. या दौऱ्यासाठीही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे..

वेस्ट इंडिजला वन-डे मालिकेत 3-0 असा ‘व्हाईट वाॅश’ दिल्यानंतर भारतीय संघ आता 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.. त्यातील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने झोकात सुरुवात केलीय.. दरम्यान, या मालिकेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली..

Advertisement

वरिष्ठांना पुन्हा विश्रांती..

झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय.. त्यात कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आदींचा समावेश आहे.. ‘बीसीसीआय’ने या दौऱ्यासाठी नवोदित खेळाडूंची निवड केली आहे.. या संघाचे नेतृत्वही ‘गब्बर’ शिखर धवनच करणार आहे.. दुखापतीमुळे संघाबाहेर असणारे वॉशिंग्टन सुंदर व दीपक चहर यांचे पुन्हा एकदा संघात आगमन झाले आहे..

Advertisement

भारत व झिम्बाब्वे यांच्यात 3 सामन्यांची वन-डे मालिका 18 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.. ‘आयसीसी एकदिवसीय सुपर लीग’चा ती एक भाग असेल. ही मालिका झिम्बाब्वेसाठी अतिशय महत्वाची आहे.. कारण, या मालिकेतील गुण झिम्बाब्वे संघाला पुढील वन-डे विश्वचषकाच्या पात्रतेसाठी महत्वाचे असतील, तर विश्वचषकासाठी भारतीय संघ आधीच पात्र ठरलाय.

Advertisement

दरम्यान, तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय संघ झिम्बवे दौऱ्यावर जाणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये भारताने झिम्बब्वे दौरा केला होता. त्यावेळी भारताने तीन वन-डे सामन्यांची मालिका, तर 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती.

वन-डे मालिकेचं वेळापत्रक

Advertisement
सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

 

भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement