SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 2,500 रुपयांच्या बजेटमध्ये फोन, खरेदी करायचाय? मग वाचा डिटेल्स..

मोबाईल फोनने मागील एका दशकात उल्लेखनीय क्रांती केली आहे. कीपॅड आणि VGA कॅमेरासह येणाऱ्या फिचर फोनऐवजी असंख्य जण आता शक्तिशाली स्मार्टफोन्स वापरत आहेत. पण काही फीचर्स फोन आजही खास वैशिष्ट्यांसह मिळत आहे. आज अशाच एका फिचर फोनविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे आपल्या घरातील आजी-आजोबा यांना वापरणं सोपं होईल.

SeniorWorld नावाच्या कंपनीने Easyfone Marvel+ हा खास आजी-आजोबांसाठी फोन बनवला आहे. Amazon आणि फ्लिपकार्टवर तुम्हाला आकर्षक सूट मिळून खरेदी करता येऊ शकतो. Easyfone Marvel+ मध्ये अधिकाधिक खास फीचर्स दिले आहेत. चला अधिक जाणून घेऊ..

Advertisement

▪️ आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त SOS बटण आहे जे फोनच्या मागील पॅनलवर आहे.

▪️ निवडलेल्या नंबरवर युजरला संपर्क करणे सोपे व्हावे यासाठी फोनमध्ये व्हाइटलिस्ट फीचर दिले आहे.

Advertisement

▪️Easyfone Marvel+ क्रॅडल चार्जरसोबत मिळतो. ज्याद्वारे फोन चार्ज करणे सोयीचे होईल. क्रॅडल चार्जरमध्ये मायक्रो-USB पोर्ट आहे, ज्याद्वारे केबल जोडली जाऊ शकते आणि प्लग इन करू शकता.

▪️भाषा सपोर्ट: इंग्रजीशिवाय हिंदी, मल्याळम, तेलगू, बंगाली, तमिळ, कन्नड अशा अनेक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो.

Advertisement

▪️ Marvel+ फोनला पॉवर देण्यासाठी 800 mAh बॅटरी दिली गेली आहे.

▪️ EasyFone Marvel Plus मोठी बटणे आणि फॉन्ट आहेत, जेणेकरून बटनावरील व फोनमधील अक्षरे वृद्धांना वाचणे अतिशय सोयीचे बनेल.फोनच्या तळाशी तुम्हाला चार्जिंग पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळेल.

Advertisement

▪️ बॅक पॅनल काढता येण्याजोगा आहे. बॅटरी देखील काढली जाऊ शकते. बॅटरी काढून टाकल्यानंतर दोन सिम पोर्ट आणि एक मायक्रोएसडी कार्ड पोर्ट दिसेल.

▪️ फोनच्या मागच्या बाजूच्या वरती फ्लॅशलाइट आहे. मागील पॅनेलच्या वरच्या बाजूला एक SOS बटण आहे, ज्यामुळे ते बटन दाबले की तुम्ही सेव्ह केलेल्या 5 आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर एसएमएस पाठवण्याव्यतिरिक्त कॉल डायल केले जातात.

Advertisement

▪️ Photo Dial फीचर आवडले, ज्याद्वारे एड्रेस बुक न उघडता 8 फोटो कॉन्टॅक्टना फेवरेट येऊ शकतं. Easyfone Marvel+ युजर्सना औषध, डॉक्टरांच्या भेटी किंवा इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमासाठी रिमाइंडर सेट करण्याची सुविधा देते. याशिवाय नको असलेले नंबर ब्लॉक करू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement