SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नाना पाटेकर पुन्हा एकदा अडचणीत, ‘या’ अभिनेत्रीने दिला इशारा…!!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्तानं ‘मी टू’चे (Me too) सनसनाटी आरोप केले होते. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. नाना पाटेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळले असून, तनुश्री हिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दिली आहे.. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे..

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Tanushree Dutta (@iamtanushreeduttaofficial)

Advertisement

बरं-वाईट झाल्यास नाना पाटेकर जबाबदार…

Advertisement

या प्रकरणाला 10 वर्षे उलटून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पाटेकर अडचणीत आलेत. तनुश्रीनं नुकतीच ‘इन्स्टा’वरुन एक पोस्ट शेअर केली असून, त्यात तिनं पुन्हा नानांवर निशाणा साधलाय. त्यात ती म्हणते, की ‘माझ्यासोबत काही बरं-वाईट झाल्यास, त्यास नाना पाटेकर, त्यांच्या वकिलांची टीम व बॉलीवूडमधील माफिया जबाबदार असतील.”

‘बॉलीवूड माफिया कोण’, या प्रश्नावर ती म्हणते, की “सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ज्यांची नावे पुढे आली होती, त्यांना ‘बॉलीवूड माफिया’ म्हणता येईल. आपण त्यांचे चित्रपट बॅन केले पाहिजेत. त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची गरज आहे. या सगळ्यांचे वकीलही सारखेच आहेत.. माध्यमांतून खोट्या बातम्या पसरविण्याचे काम केले जात आहे..”

Advertisement

तनुश्री पुढे म्हणते, की “माझ्याबाबत जाणून-बुजून अपप्रचार करण्यात आला. माध्यमांतून खोट्या बातम्या पसरविण्यात आल्या. त्यांनी मला खूप मानसिक त्रास दिला. त्या विषयी मी अनेकदा बोलली. आता न्यायासाठी व्यक्त होतेय. भले कायदेशीरित्या मी अपयशी ठरली असेन, मात्र या महान देशातील लोकांवर मला पूर्णपणे विश्वास आहे. जय हिंद, पुन्हा भेटू या…”

दरम्यान, तनुश्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहे.. अनेक जण पुन्हा एकदा तनुश्रीला ट्रोल करताना दिसत आहेत, तर काहींनी तिच्या बाजूनेही मत मांडले आहे.. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा जूने प्रकरण समोर आल्याने नाना पाटेकर अडचणीत आल्याचे दिसत आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement