SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

8 वी ते 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, मद्रास हायकोर्टात बंपर पदभरती..!!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 8 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मद्रास हायकाेर्टात तब्बल 1,400 हून अधिक रिक्त जागांसाठी पदभरती सुरु झाली आहे.. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे..

मद्रास हायकोर्टात (Madras Highcourt recruitment) होणाऱ्या य पदभरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

पदनिहाय जागा

 • परीक्षक – 118
 • वाचक – 39
 • सीनियर बेलिफ – 302
 • ज्युनिअर बेलिफ – 574
 • प्रोसेस सर्व्हर – 41
 • प्रक्रिया लेखक – 3
 • झेरॉक्स ऑपरेटर – 267
 • लिफ्ट ऑपरेटर – 9
 • ड्राइवर – 59

दरमहा पगार

Advertisement
 • परीक्षक, वाचक, ड्रायव्हर व सिनिअर बेलिफ – सुरुवातीला दरमहा 32 हजार रुपये
 • अन्य पदांसाठी वेतन श्रेणीनुसार 19,000 ते 69,900 रुपये, 16,000 ते 60,800 रुपये, तसेच 15,900 ते 58,500 रुपये.

आवश्यक पात्रता

 • परीक्षक, वाचक, चालक आणि वरिष्ठ बेलिफ – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.
 • ज्युनिअर बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्रोसेस रायटर, झेरॉक्स ऑपरेटर व लिफ्ट ऑपरेटर – उमेदवार किमान 8 वी उत्तीर्ण असावा, संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही असावा.

वयोमर्यादा

Advertisement
 • एससी / एसटी उमेदवारांसाठी – 18 ते 37 वर्षे
 • अतिरिक्त मागासवर्ग, विमुक्त समाज व मागास प्रवर्गासाठी – 18 ते 34 वर्षे
 • सर्वसाधारण – 18 ते 32 वर्षे

अर्ज शुल्क

 • सर्वसाधारण, ओबीसी व इतर प्रवर्गासाठी – 550 रुपये
 • एससी / एसटी प्रवर्गासाठी – अर्ज शुल्क नाही

निवड प्रक्रिया – वरील पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

असा करा अर्ज

Advertisement
 • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ mhc.tn.gov.in भेट द्या.
 • अर्ज भरण्याच्या पोस्टवर क्लिक करा.
 • फोटो, सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • शेवटी अर्ज शुल्क भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
 • अर्जाची प्रिंट काढून भविष्यातील कामासाठी तुमच्याकडे ठेवा.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement