SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोर का झटका, ‘या’ बालेकिल्यात उभी फूट..

राज्यात मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यापैकी जालना जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना अर्जुन खोतकर यांच्या रुपाने एक समर्थक मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यात सुरेश नवलेही शिंदे गटात आले आणि आता परभणीत देखील आता शिंदे गटाची एंट्री झाली आहे. मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या परभणीमध्ये उभी फूट पडली आहे.

परभणीमध्ये शिवसेनेचे आमदार, खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात सहभागी होत आहेत. आता माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, त्यांचे पुत्र परभणी विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह शिवसेना, युवासेनेतील पदाधिकारी व अनेक शिवसैनिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे अनेक वर्षांपासूनचा शिवसेनेचा हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. गोपीकिशन बाजोरियांवर संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement

राज्यभरातून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौरा करून शिवसेना पुन्हा एकदा पक्षबांधणी करण्यासाठी ठाकरे सक्रीय होत आहेत. आता शिंदे गटाविरोधात असणाऱ्या शिवसेनेने शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी पॉवरफुल नेता शोधण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी आमदार, नेते आपल्या गटात वळवले तसेच राज्याचे नेतृत्व हाती आल्यानंतर यानंतर आणखी इनकमिंगला जोर आला. काही नेते बळजबरी आले, काहींनी ट्रेंड चालला म्हणून प्रवेश केला, काहींना आतून इच्छा असली तर काहीतरी अडलं आहे म्हणून प्रवेश केला नाहीयेत. याशिवाय इतर पक्षांतील काही नेते, आमदार, खासदार यांनी जिथे ओळख मिळाली, तो पक्ष अजून सोडलेला नाही, ही चांगली बाब आहे. परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतलाय.

Advertisement

परभणी लोकसभा मतदारसंघात जनतेतून निवडून आलेले खासदार संजय जाधव, परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील हे सध्या तरी गेल्या 30 वर्षांचा इतिहास पाहून शिवसेनेसोबतच आहेत. दरम्यान, दुसरीकडे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement