SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका. तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. काही कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील. आज तुम्ही तुमचे लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल.

वृषभ (Taurus): फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. शारीरिक कंटाळा झटकून टाकावा. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील.

कर्क (Cancer) : हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण होईल. वडीलांशी खटके उडू शकतात. आर्थिक कामात फसवणुकीपासून सावध राहावे. थोरांच्या सल्ल्याची गरज भासेल. इतरांना स्वत:चे महत्त्व पट‍वून द्याल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे अधिक लक्ष राहील.

Advertisement

सिंह (Leo) : प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव चांगला राहील. चांगला धनलाभ होईल. एखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण.

कन्या (Virgo) : कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील.

Advertisement

तुळ (Libra) : द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामे पार पडतील. व्यवहारात फार हटवादीपणा करू नका. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. तुमच्यासाठी आनंददायी बातम्यांचे प्राबल्य कायम राहील.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनामध्ये आनंद राहील. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. तुम्हाला कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : अचानक धनलाभाची शक्यता. परोपकाराच्या जाणि‍वेतून कामे कराल. पोटाच्या तक्रारी राहतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जास्त संवेदनशील होऊ नका. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पत्नी व अपत्य यांचाकडून अनुकूल स्थिती मिळेल.

मकर (Capricorn) : व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामात चांगला फायदा होईल. मनात सकारात्मक विचार येतील. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते.

Advertisement

कुंभ (Aquarious) : प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा. पैशाशी संबंधित बाबी चांगली राहतील. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी चर्चा करू शकता. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाल, त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : जवळच्या मित्रांशी भेट होईल. कामे मनाजोगी पार पडतील. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्य निरोगी राहील. मित्र-मैत्रीणींची भेट होईल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. मनात संयम ठेवा. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी यशस्वी राहतील. आरोग्य उत्तम राहील. वाहन चालवताना सावध रहा.

Advertisement