SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एसटी प्रवास होणार अधिक सुखकर, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय..

गेल्या काही वर्षांपासून एसटीचे चाक खोलात रुतले आहे.. कोरोनामुळे कित्येक दिवस एसटी बंद होती. त्यानंतर एसटी कर्मचारी संपावर गेले.. त्यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.. त्यात सातत्याने होणारी इंधन दरवाढ व प्रवाशांची घटलेली संख्या, यामुळे एसटीवरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच आहे..

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटी (ST) महामंडळ, तसेच राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राज्यातील 1 हजार एसटी बसचे डिझेलवरून ‘सीएनजी’मध्ये (CNG) रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

Advertisement

राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी, तसेच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व सीएनजी बसला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात काही ‘ई- बस’ दाखल झाल्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.. त्यामुळे आता ‘सीएनजी’वरील एसटी तयार केल्या जात आहेत.

8 वर्षांखालील बसचा समावेश

Advertisement

राज्य परिवहन महामंडळाकडून सुरुवातीला 1 हजार एसटींचे रुपांतर ‘सीएनजी’मध्ये करणार आहे. या सर्व गाड्या 8 वर्षांच्या आतील असतील. इंजिनसह अन्य बाबी चांगल्या असतील, या उद्देशाने या बस ‘सीएनजी’वर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटीचे सामान्यपणे आयुर्मान 15 वर्षांचे असते.

एसटी बसचे रुपांतर डिझेलवरून ‘सीएनजी’मध्ये केले जात आहे. त्याचे ‘प्रोटोटाईप’ बनविण्याचे काम सुरु झाले असून, येत्या महिन्याभरात सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात ‘सीएनजी’ कीट बसविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत पुणे विभागातील राजगुरुनगर, शिरूर व बारामती या तीन आगारांचा यात समावेश केला आहे..

Advertisement

‘टोरॅन्टो गॅस कंपनी’कडून या आगारांना गॅस पुरवठा होणार आहे. दर महिन्यातील या तिन्ही आगारातील प्रत्येकी 30 एसटी बसचे रुपांतर डिझेलवरून ‘सीएनजी’मध्ये केले जाईल. दुसऱ्या टप्प्यांत शहरी भागांतील आगारांचा समावेश करणार असल्याची माहिती मुंबईचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement