भारतीय क्रिकेट टीमने वेस्ट इंडिजविरुद्धची (Ind vs Wi) मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने तिसरा एकदिवसीय सामना 119 रन्सने जिंकून मालिका 3-0 ने जिंकली आहे. वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना काल बार्बाडोस येथे खेळला गेला.
भारताने मालिकेमध्ये पहिले 2 सामने जिंकले होते आता तिसरा सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने मालिका खिशात घातली आहे. काल (ता. 27 जुलै) झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजीनंतर टीम इंडियाची गोलंदाजीही उत्कृष्ट झाली होती.
सामना सुरू होण्यापूर्वी आधी भारताने टॉस जिंकून पहिली फलंदाजी केली. फलंदाजी करताना भारताकडून शिखर धवन 7 चौकारांसह 74 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. शुभमन गिल 98 धावा करत नाबाद राहिला. भारतीय संघाची तीन सामन्यांच्या मालिकेतील ही दुसरी शतकी सलामी भागीदारी ठरली.
टीम इंडियाच्या डावाच्या 36व्या ओव्हरमध्ये पाऊस आला आणि खेळाडूंना मैदान सोडावं लागले. त्यावेळी गिल 98 धावांवर नाबाद होता, तर श्रेयस अय्यरने गिलला साथ देत 44 रन्स केले. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे वेस्ट इंडिजला विजयासाठी 35 ओव्हरमध्ये 257 रन्सचं लक्ष्य देण्यात आले आहे. पण वेस्ट इंडीज टीम अवघ्या 137 रन्सवर गारद झाला.
भारताकडून युझवेंद्र चहलने 4, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने 2 तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने 1-1 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीज विरोधात सलग तिसरा सामना जिंकून भारताने पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्डदेखील मोडला आहे. पाकिस्तानने झिम्बाब्वेविरोधात सलग 11 वनडे सीरीज जिंकल्या होत्या. तर भारताने 2007 पासून आतापर्यंत विंडीजविरोधात 12 वेळा वनडे सीरीजमध्ये विजय मिळवला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy