SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाचा चांगला आनंद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही बाबींची गुप्तता पाळाल. शब्द, पैसा आणि वेळ यांचे महत्त्व ओळखणे हिताचे. घाईपेक्षा संयम लाभदायी ठरेल. दिवस चांगला आहे. प्रगतीचा योग आहे. आर्थिक आवाक चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.

वृषभ (Taurus): जवळचा प्रवास मजेत पार पडेल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. उत्तम साहित्य वाचनात येईल. काहीसे लहरीपणे वागाल. चारचौघात मिळून-मिसळून वागाल. प्रामाणिकपणा, प्रसंगी सत्य गोड बोलत सांगणे, प्रयत्नांमधील सातत्य यामुळे यश लाभेल. सहकाऱ्यांची साथ लाभेल. प्रगतीचे योग आहेत. महत्वाचे काम मार्गी लागेल. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली राहील. नवीन संधी दिसतील. मुलांना यश मिळेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. घराची सजावट कराल. तुमच्यातील सुप्तगुण दिसून येतील. बुद्धीचा वापर करणे हिताचे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. प्रगती होईल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय कामगिरी करता येईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. जीवनसाथीशी सूर जूळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल.

कर्क (Cancer) : वारसाहक्काची कामे मार्गी लावाल. उगाच नैराश्याला बळी पडू नका. कामाची घाई गडबड राहील. कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जास्त चिकित्सा करत बसू नका. हुशारीने काम करा. कधी स्पष्ट बोलावे, कधी साखरेत घोळवून सत्य सांगावे आणि कधी मौन राखावे हे जमले तर यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन संधी मिळेल.

Advertisement

सिंह (Leo) : प्रकृती काहीशी नरमगरम राहील. पित्तविकार वाढू शकतो. कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. शांतपणे विचार करावा. संयम आपल्यासाठी लाभदायी आहे. प्रयत्नांमधील सातत्य प्रगतीसाठी हितकारक आहे. आर्थिक प्रगती होईल. इतरांवर प्रभाव पाडाल.मदत मिळेल. काम मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय राहील. पाहुणे येतील. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल.

Advertisement

कन्या (Virgo) :स्त्रियांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवाल. व्यवसायातून लाभ संभवतो. जोडीदाराचे वर्चस्व राहील. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. करमणुकीत वेळ घालवाल. वाद टाळणे आणि ओळखी वाढवून स्वार्थ साधणे आज जमल्यास प्रगती होईल. गृहसौख्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्र, मैत्रिणी यांच्या सहवासात याल. करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल.

तुळ (Libra) : वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. दिवस छानछोकीत घालवाल. प्रेमळ मैत्री लाभेल. प्रेमप्रकरणातील सौख्याला बहर येईल. सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल. ओळखी वाढवाल आणि त्यांचा व्यवस्थित वापर कराल. गोड बोलून प्रभाव पाडाल. कुणाला उसने पैसे देताना विचार करुन घ्या. कुठे सही करायची असेल तर कागदपत्रे वाचूनच सही करा. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. बोलण्यावर संयम ठेवा.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : मनात उगाच चिंता लागून राहील. घरातील ताणतणाव दूर करावेत. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. अति वाहत जाऊ नका. कामावर लक्ष केंद्रीत करा. वाद टाळून प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. घरात चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. मनात सकारात्मक विचार राहतील. मित्र, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

Advertisement

धनु (Sagittarius) : दिवस सौख्याचा असेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जोडीदाराचे प्रेमळ सुख मिळेल. भागीदारीत चांगला नफा होईल. मोठ्या लोकात ऊठबस होईल. सामर्थ्य आणि क्षमता ओळखून त्यांचा पुरेपूर वापर कराल. वास्तवाचे आणि व्यावहारिकतेचे भान राखून प्रगती कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मकर (Capricorn) : घरात मंगलकार्ये घडतील. स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. व्यवसायात बरकत राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. आत्मविश्वासाने कामे कराल. आर्थिक आवाक चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : कौटुंबिक वातावरणात रमून जाल. चैनीवर खर्च कराल. सर्वांशी मधाळ बोलाल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल. कष्ट करणाऱ्याला यश मिळेल. अडचणींमधून मार्ग निघेल. कौटुंबिक सुख लाभेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल. संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. संयमाची परिक्षा पाहिली जाईल. मधुर संभाषण करा. कुणाला दुखवू नका.

मीन (Pisces) : कामाचे प्रशस्तिपत्रक मिळेल. मनातील इच्छांची पूर्तता होईल. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल. शेअर्स मधून चांगली कमाई करता येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कायदा, नियम यांचे पालन करणे आणि वाद टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण खात्री करुन घेणे लाभाचे. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरातील सदस्यांसाठी वेळ काढा. जीवनसाथी आणि मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत अडचणींना तोंड द्यावे लागले.

Advertisement