SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिखर धवनच्या बॅटिंगवरुन रोहित शर्मा नाराज, ‘बीसीसीआय’ घेणार मोठा निर्णय..

कधी काळी भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ समजल्या जाणारा शिखर धवन आता फक्त एका फॉर्मेटपुरता मर्यादित झालाय.. सध्या तो फक्त वन-डे क्रिकेट खेळतो. त्यातही तो फारसा फाॅर्ममध्ये नसल्याचे दिसून येतंय. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतही तो धावांसाठी संघर्ष करीत होता. वेस्ट इंडिजमध्ये त्याची बॅट फारशी तळपलेली नाही..

दरम्यान, शिखर धवनच्या बॅटिंग स्टाईलवरुन कॅप्टन रोहित शर्मा काहीसा नाराज असल्याचे समोर आलं आहे.. शिखर धवन बॅटिंगला आल्यावर स्थिर-स्थावर होण्याचा प्रयत्न करतो. खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ही बाब कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही..

Advertisement

शिखरने आक्रमक खेळावे…

शिखर धवनला आपल्या फलंदाजीची पद्धत बदलण्याची गरज असून, त्याने अधिक आक्रमक पद्धतीने खेळावे, असे मत रोहित शर्माने मांडले आहे.. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर 2023 मध्ये वन-डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.. त्यामुळे शिखर धवनच्या भविष्यातील योजनांबाबत निवड समितीचे सदस्य त्याच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Advertisement

याबाबत निवड समितीतील सदस्याने सांगितले की, “शिखर व रोहितमध्ये कुठलाही वाद नाही. फक्त दोघांच्या खेळाबाबतच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत आणि ही काही वाईट गोष्ट नाही. भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा झाल्यानंतर आम्ही शिखर धवन बरोबर त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करु..”

शिखरला त्याच्या फलंदाजीच्या पद्धतीत बदल करायचा गरज असेल, तर कोच राहुल द्रविड, विक्रम राठोड तेथे आहेत. ते त्याच्याबरोबर बोलतील. त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नसल्याचे या सदस्याने सांगितले..

Advertisement

दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावर शिखर धवनकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजबरोबर तिसरा वन-डे सामना आज (ता. 27) सायंकाळी सुरु होणार असून, त्यात भारताला या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ची संधी आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement