SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बीएसएनएल’बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, ग्राहकांचा होणार फायदा..!

गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलीय. खासगी कंपन्यांच्या तुलनेत दर्जेदार सेवा देण्यात ‘बीएसएनएन’ला जमले नाही.. त्यामुळे ग्राहकांनी या सरकारी कंपनीकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली नि कंपनीचा तोटा वाढत गेला.. परिणामी, बीएसएनएलचा बाजार हिस्साही कमकुवत होत गेला..

‘बीएसएनएल’च्या वाढत्या तोट्यामुळे केंद्र सरकारही चिंतेत होते. अखेर त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, टेलिकाॅम उद्योगात बस्तान बसवण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..

Advertisement

‘बीएसएनएल’साठी पॅकेज जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. 27) केंद्रिय मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात ‘बीएसएनएल’च्या (BSNL) पुनरुज्जीवानासाठी मोदी सरकारने सुमारे 1.64 लाख कोटी रुपयांचे रिव्हायवल पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

Advertisement

तसेच, केंद्र सरकारने ‘बीएसएनएल’वरील 30,000 कोटींचे कर्ज कमी व्याजाच्या बाँडद्वारे फेडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, ‘बीएसएनएल’ व ‘बीबीएनएल’च्या विलीनीकरणालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.

‘बीएसएनएल’ व ‘बीबीएनएल’च्या विलीनीकरणामुळे ‘बीएसएनएल’कडे देशभर पसरलेल्या ‘बीबीएनएल’ (BBNL)च्या 5.67 लाख किमी ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असेल. सरकार येत्या तीन वर्षांत ‘बीएसएनएल’साठी 23 हजार कोटींचे बॉन्ड जारी करणार आहे.

Advertisement

तसेच, ‘एमटीएनएल’ (MTNL) साठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचे बॉन्ड जारी केले जाणार आहेत. ‘बीएसएनएल’च्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने 1,64,156 कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केलेय. त्यामुळे या टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार असल्याचे अश्विनी वैष्णव म्हणाले.

देशातील मोबाइल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 19,722 टॉवर बसवले जातील. मोबाईल कनेक्टिव्हिटी नसलेल्या सर्व गावांमध्ये 4G कव्हरेज प्रदान केले जाईल. देशाच्या प्रत्येक भागात मोबाईल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement