SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुन्हा मुसळधार? हवामान विभागाचा ‘या’ 18 जिल्ह्यांना अलर्ट जारी..

राज्यामध्ये मागील सात-आठ दिवसांत मराठवाड्यात तुफान पाऊस होऊन विदर्भातही जोरदार पाऊस झाल्याचं दिसलं. याशिवाय नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असलेल्या दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मागील दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी रिपरिप बघायला मिळाली.

हवामान विभागाकडून अलर्ट जारी..

Advertisement

राज्यातील मुसळधार आणि कुठे संततधार पावसाची आहे. अनेक जिल्ह्यांतील नद्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांत पाणी घुसल्याने लोकांचे स्थलांतर चालू आहे. यातच आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD Rain Alert) आज पुण्यासह सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 18 जिल्ह्यांना पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट करून माहीती दिली आहे. आज बुधवारी (27 जुलै) कमी-अधिक प्रमाणात राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार आहे.

Advertisement

पण गुरुवारनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी हवामान खात्याने पुण्यासह, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, या 11 जिल्ह्यांना पिवळा इशारा दिला आहे. या जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर देशात 29 आणि 30 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मेघालय, मनीपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement