SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल मॅप’कडून भन्नाट फीचर सादर, युजर्सचा होणार ‘असा’ फायदा…

‘गुगल’.. जगभरातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन.. आपल्या युजर्ससाठी ‘गुगल’तर्फे वेगवेगळ्या सेवा पुरवण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे, ‘गुगल मॅप’.. अनोळखी शहरात योग्य ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ‘गुगल मॅप’ची (Google map) मोठी मदत होते. युजर्सच्या मदतीसाठी ‘गुगल मॅप’मध्येही सातत्याने वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत.

काही महिन्यांपूर्वी ‘गुगल मॅप’मध्ये विना टोल रस्ते, तसेच रस्त्यावरील ट्रॅफिकची माहितीही दिली जात होती. ‘गुगल मॅप’वर आता युजर्सना आणखी एक सेवा मिळणार आहे. ‘गुगल मॅप्स’मधील या नव्या फीचरचे नाव आहे.. ‘स्ट्रीट व्ह्यू फीचर’..! भारतातील ठराविक 10 शहरांमध्ये आजपासून (ता. 27) हे फीचर सादर करण्यात आल्याची घोषणा  ‘गुगल मॅप्स’कडून करण्यात आली..

Advertisement

यावर्षी झालेल्या ‘गुगल आय/ओ'(Google I/O) या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ‘गुगल’कडून या नव्या फीचरची घोषणा करण्यात आली होती.. भारतात हे फीचर (Google Street View) उपलब्ध होण्यासाठी ‘गुगल’ने ‘टेक महिंद्रा’ आणि ‘जेनेसिस इंटरनॅशनल’ या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे..

फीचरचा फायदा काय..?

Advertisement

‘गुगल स्ट्रीट व्ह्यू’मुळे युजर्सना रस्ते व सार्वजनिक ठिकाणच्या इमारतींचा ‘360 अंश डिग्री व्ह्यू’ (360 Degree View) मिळणार आहे. त्यामुळे युजर्सना हव्या त्या जागेचा अधिक चांगला अनुभव घेता येणार आहे.. आजपासून (27 जुलै) भारतातल्या 10 शहरांमध्ये ‘स्ट्रीट व्ह्यू’ फीचर गुगल मॅप्सवर उपलब्ध होणार आहे.

राजधानी दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, बडोदा, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अमृतसर, अशा 10 शहरांचा त्यात समावेश आहे. भागीदारी केलेल्या स्थानिक कंपन्यांकडून मिळालेल्या ताज्या चित्रणासह या 10 शहरांतल्या सुमारे दीड लाख किलोमीटर्स अंतरावरच्या क्षेत्राची माहिती ‘स्ट्रीट व्ह्यू’मध्ये मिळणार आहे..

Advertisement

खरं तर सुरुवातीला या फीचरला भारतात मान्यता नव्हती. भारतातल्या कोणत्याही क्षेत्राच्या चित्रणाचा मालकी हक्क परदेशी कंपन्यांकडे असू नये, असं सरकारचं धोरण होतं. 2021 मध्ये ‘नॅशनल जिओस्पॅशियल पॉलिसी’ आली. या धोरणानुसार, अशा डेटाची मालकी परदेशी कंपन्यांकडे नसल्यास त्याला परवानगी देण्यात आली.

‘टेक महिंद्रा’ व ‘जेनेसिस इंटरनॅशनल’ या कंपन्यांची भागिदारी असल्याने ‘गुगल स्ट्रीट व्ह्यू’ फीचरला मान्यता देण्यात आलीय. 2022च्या अखेरपर्यंत देशातल्या किमान 50 शहरांत हे फीचर देण्याचं तिन्ही कंपन्यांचे नियोजन असल्याचं समजतं.

Advertisement

असं वापरा हे फीचर..

  • मोबाईलमधील ‘गुगल मॅप्स’ ओपन करून हवं ते ठिकाण शोधा किंवा त्यावर पिन नेऊन ठेवा.
  • खाली आलेलं ठिकाणाचं नाव किंवा पत्त्यावर टॅप करा.
  • स्क्रोल करून ‘स्ट्रीट व्ह्यू’ असं लेबल असलेला फोटो सिलेक्ट करा किंवा ‘स्ट्रीट व्ह्यू’ आयकॉन असलेला ‘थम्बनेल’ निवडा.
  • गुगल मॅप्समध्ये गेल्यावर ‘Layers’वर टॅप करून नंतर ‘Street View’ वर टॅप करूनही हा पर्याय प्राप्त करता येतो.
  • मॅपवरच्या निळ्या रंगाच्या रेषा ‘स्ट्रीट व्ह्यू’चं कव्हरेज दर्शवतात. त्यामुळे कोणत्याही निळ्या रेषेवर टॅप केल्यास स्ट्रीट व्ह्यूमध्ये जाता येतं.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement