SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): मैत्रीचे संबंध अधिक घनिष्ट होतील. नियमांचे उल्लंघन करून चालणार नाही. पित्त विकारात वाढ संभवते. हातापायाला किरकोळ दुखापत होऊ शकते. जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. धार्मिक कार्यात मन लागेल. प्रयत्नांना यश मिळेल. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका.

वृषभ (Taurus): हलका व सकस आहार घ्यावा. वादाचे प्रसंग चिघळू शकतात. जोडीदाराशी समजुतीने वागावे लागेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टीपासून दूर राहू नका. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहार येईल. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

Advertisement

मिथुन (Gemini) : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघांना प्रेमाने आपलेसे कराल. व्यावसायिक लाभाने सुखावून जाल. थकवा आणि चिंता वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विचारपूर्वक खर्च करा. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही.

कर्क (Cancer) : क्षुल्लक गोष्टींवरून चीडचीड कराल. मुलांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील कौशल्य पणाला लागेल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आळस झटकून कामे करावी लागतील. नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. मनाजोगी खरेदी करता येईल. जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून पहाल. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

Advertisement

सिंह (Leo) : दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर द्या. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. आवडत्या कलेचा आनंद घ्याल. काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात. व्यवहार लाभदायक ठरतील. कायदेशीर अडचणी दूर होतील. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

Advertisement

कन्या (Virgo) : जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. मनातील भलते सलते विचार काढून टाका. तुमच्यातील छुपे कलागुण सर्वांसमोर येतील. रागावर नियंत्रण मिळेल. शुभवार्ता मिळेल. उत्पन्न वाढेल. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

तुळ (Libra) : क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. आर्थिक गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. अतिरिक्त खर्च वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. कामात नवीन शिकायला मिळेल. शेअर्स मधून चांगला लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित कामांमधून आर्थिक मान वाढेल. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : नवीन कामाचा बोझा अंगावर पडू शकतो. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. आर्थिक कमतरता भरून निघेल. मानसिक चंचलता दूर करावी. घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

Advertisement

धनु (Sagittarius) : जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. समोरील कामे आधी पूर्ण करावीत. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून खटका उडू शकतो. घरगुती कामात दिवसभर गुंतून पडाल. काही खर्च अचानक सामोरे येतील. धोका पत्करण्याची वेळ येईल. धोका पत्करणे टाळा. घरात प्रसन्न वातावरण राहील. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.

Advertisement

मकर (Capricorn) : जवळच्या मित्रमैत्रिणींची गाठ पडेल. बर्‍याच दिवसांची इच्छा आज पूर्ण होईल. मानापमानाच्या प्रसंगांनी डगमगू नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. मन समाधानी राहील. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल.

कुंभ (Aquarious) : कामाचा व्याप वाढू शकतो. भावंडांची जबाबदारी अंगावर पडेल. अती कामामुळे बौद्धिक ताण जाणवेल. गोष्टी एकाच जागी खिळून पडल्यासारख्या वाटतील. क्षणिक मोहाला बळी पडू नका. जोडीदाराचे प्रेम मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आरोग्यावर खर्च वाढेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल.

Advertisement

मीन (Pisces) : रेस, जुगारातून धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून काही प्रमाणात लाभ होईल. वरिष्ठांशी मतभेदाचे प्रसंग टाळावेत. शांत व संयमी विचार करावा. आपली संगत एकवार तपासून पहावी. कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. बाहेर जाण्याचा योग येईल. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील.

Advertisement