SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, वाचा यादी..

भारतामध्ये पर्यटनस्थळे खूप आहेत. आपण राज्यामध्ये भ्रमंती करताना अनेक ठिकाणे असली तरी तरीही लोकांना परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असते. मात्र, अनेक वेळा प्लॅन व्हिसा नसल्याने फ्लॉप होतो. मग बाहेरील देश बघण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहतं. पण काही देशांमध्ये तुम्हाला व्हिसाशिवायही फिरता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला विना व्हिसा आनंद घेता येणार आहे.

अलीकडील हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवालामध्ये भारत 87 व्या क्रमांकावर आहे, एक जागतिक पासपोर्ट रँकिंग चार्ट जो आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्राधिकरण (IATA) च्या डेटाचा वापरून पासपोर्टमध्ये ‘सर्वात मजबूत’ आणि ‘कमकुवत’ आहे. भारताच्या पासपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, 60 देशांमध्ये व्हिसाविना प्रवास करण्याची परवानगी देते.

Advertisement

ज्या देशांमध्ये भारतीयांना ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ प्रवेश आहे त्या देशांमध्ये थायलंड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंका अशा काही आशियाई ठिकाणांचा समावेश होतो. आफ्रिकेत 21 देश आहेत जे भारतीय नागरिकांना ऑन-अरायव्हल व्हिसा देतात. असं करायचं म्हटलं तर फक्त दोनच युरोपीय देश आहेत.

व्हिसाशिवाय प्रवास, वाचा देशांची यादी:

Advertisement

युरोप- अल्बेनिया, सर्बिया

ओशनिया – कुक बेटे, फिजी, मार्शल बेटे, नियू, सामोआ, वानुआतु, तुवालू, पलाऊ बेट, मायक्रोनेशिया

Advertisement

अमेरिका- बोलिव्हिया, एल साल्वाडोर

मध्य पूर्व- इराण, ओमान, जॉर्डन, कतार

Advertisement

कॅरिबियन- सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, डोमिनिका, हैती, ग्रेनाडा, जमैका, मॉन्टसेराट, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, जमैका,

आफ्रिका- बोत्सवाना, रवांडा, स्नेगल, सियाचल, सिएरा लिओन, सोमालिया, टांझानिया, टोगो, युगांडा, बुरुंडी, कॅप वर्डे बेट, कोमोरो बेट, इथिओपिया, गॅबॉन, गिनी बिसाऊ, मादागास्कर, मॉरिशस, मॉरिटानिया, मोझांबिक, ट्युनिशिया, जिमबावे
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement