SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हिरो कंपनीची खिशाला परवडणारी बाईक लॉंच, वाचा धमाकेदार फीचर्स..

देशातील आघाडीची कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारामध्ये सर्वसामान्यांसाठी नेहमीच खिशाला परवडणाऱ्या बाईक्स आणल्या आहेत. यंदाही कंपनीने सुपर स्प्लेंडर कॅनव्हास ब्लॅक एडिशन लाँच केले आहे. ज्याच्या किंमती 77,430 रुपयांपासून सुरू आहेत. कंपनीच्या या 125cc कम्युटर मोटरसायकलमध्ये ड्रम आणि डिस्क असे दोन प्रकार आहे.

जर तुम्हीही अनेक वर्षांपासून स्प्लेंडरचे चाहते असाल आणि तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर Hero MotoCorp eShop वर या मोटरसायकलचे बुकिंग ऑनलाईन आहे. मोटरसायकल तुम्ही Hero MotoCorp eShop वर ऑनलाईन बुक करू शकाल. या मोटरसायकलच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 77,430 रुपये आणि डिस्क व्हेरिएंटची किंमत 81,330 रुपये आहे.

Advertisement

फीचर्स काय आहेत?

भारतीय बाजारात लॉंच झालेली नवीन सुपर स्प्लेंडर ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरिएटच्या फ्युअल टँकवर क्रोम ‘सुपर स्प्लेंडर’ बॅजसोबत ऑल-ब्लॅक पेंट दिला गेलाय. तसेच हेडलाईटजवळ आणि एक्झॉस्ट हीट शील्डवर क्रोम एलीमेंट दिले आहेत. या स्प्लेंडरचे काही फीचर्स स्टँडर्ड सुपर स्प्लेंडरशी मिळतेजुळते आहेत. त्याच्या ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरिएंटमध्ये सिंगल-पॉड हेडलाइट, टिंटेड व्हिझर, सिंगल-पीस सीट, अलॉय-व्हील व साइड-स्लंग एक्झॉस्ट पॅक दिले आहेत .

Advertisement

सध्या लॉंच झालेल्या या नवीन सुपर स्प्लेंडर ब्लॅक आणि एक्सेंट व्हेरियंटमध्ये BS6 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळणार आहे. 7,500rpm वर 10.7bhp आणि 6,000rpm वर 10.6Nm पीक टॉर्क जनरेट करते. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, फाइव्ह-स्टेप ॲडजस्टेबल रिअर स्प्रिंग आणि दोन्ही चाकांवर 130mm ड्रम ब्रेक मिळतील. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सेफ्टी नेटमध्ये एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement