SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

होम लोन घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा, अन्यथा होईल नुकसान..

घर ही अशी एक वास्तू आहे, जी घरातील सर्व सदस्यांना छत देते. अनेक वर्षे एका घरात काढल्यानंतर त्या घराशी आपले घट्ट नाते होते. भावनिक नात्याने घराला आणखी घरपण देण्याचा आपला सकारात्मक विचार असतो. तर अनेक वर्ष जुने असणारे घर आपण पाडून नवीन बांधतो किंवा इतर कुठेतरी दुसरं नवीन घर घेण्याचा आणि बांधण्याचा विचार करतो अशा वेळेस गृहकर्ज (Home Loan) घेताना काय लक्षात ठेवावं, जाणून घ्या..

घराची आवश्यकता आणि नियोजन:

Advertisement

घर बांधण्यासाठी आपण प्रथम जागा घेतो. तुम्ही जागा का खरेदी करत आहात हे शोधून काढणे आवश्यक आहे. जागा किंवा घर तुम्ही स्वत:च्या वापरासाठी घेताय की गुंतवणुकीसाठी घेताय हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

घर बांधायचं म्हटलं की घेतलेली जागा शेती प्लॉट आहे की एनए आहे हे बघावं. कोणत्या झोनमध्ये किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा कोणाच्या अंतर्गत येते. एखाद्या व्यक्तीचा प्लॉट घेत असाल तर त्या जागेच्या उताऱ्यावर मूळ मालक कोण आहे किंवा इतर किती जणांची नावे आहेत, हे तपासा जेणेकरून घरगुती वादाच्या फंद्यात तुमचं नुकसान टळेल.

Advertisement

घर जागा घेऊन बांधायचं असेल तर नवीन घर बांधणे हा खर्चिक पर्याय आहेच, पण जर कुणाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून घर बांधायचं असल्यास पुढील अनेक वर्षांचा विचार करता दुरुस्ती आणि नुतनीकरणावरील तुमचा खर्च वाचू शकतो. याशिवाय घर खरेदी करत असल्यास करार करण्यापूर्वी प्लंबिग, वॉटरप्रूफिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन चेक करून घ्या.

घराची आवश्यकता घरात अंदाजे सध्या किती लोक राहतात आणि भविष्यात बांधकाम वाढवण्यासाठी काय योजना आहे हे विचार करून करा. 1 बीएचके आणि 2 बीएचकेचा विचार करता साधारणत: 600 ते 1,000 स्क्वेअर फूट एवढे घर असावे. घर किती मोठं हवं यावर तुमचं बजेट आणि आर्थिक भविष्य ठरवता येईल.

Advertisement

तुमचे उत्पन्न आणि खर्च काऊंट करून घ्या. डाऊनपेमेंट (एडव्हान्स) किती करू शकता किंवा मासिक हप्ते फेडण्यासाठी किती रक्कम बाजूला काढायला जमेलक्स याचा नीट अभ्यास करा. जर काही फायनान्स प्लॅननुसार कर्ज घेतलेच तर कर्ज फेडण्याचा कालावधी आणि व्याजात पैसे कमी जावेत, यासाठी डाऊन पेमेंट वाढवण्याचा पर्याय अधिक चांगला आहे.

कर्ज कोणत्या बँकेतून अथवा वित्तिय संस्थेतून घ्यावं याची यादीच तयार करा, कुठे व्याजदर कमी आहे ते कळेल. तुम्हाला तुमचे नातेवाईक, मित्र किंवा ऑफिसमधील सहकारी कर्ज घेण्याबाबत सल्ले देतीलच. मात्र, तुम्ही चांगला पर्याय बघून बँकेतून कर्ज घ्या. तुम्हाला दिली जाणारी वागणूक, कंपनीच्या अटी व शर्ती, शुल्क, ईएमआय याबाबतची माहिती नीट दिली का, याचा विचार करा. जर तुम्ही तुमचे कर्ज फ्लोटिंग व्याज दराने घेतले असेल जेथे तुम्हाला कोणतेही प्रीपेमेंट शुल्क आकारले जात नाही. ईएमआयमध्ये व्याज आणि मुद्दल रक्कम असे दोन घटक असतात. बँक किंवा संस्था डिजिटली सक्षम आहे की दरवेळी बँकेतच जावे लागेल, हे देखील तपासा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement