SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बॅंकेतील एफडी मोडायची आहे? मग बँक घेणार ‘एवढे’ पैसे..

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी फिक्स व्याजदर आणि चांगला परतावा मिळण्यासाठी मुदत ठेव (FD) ही सुरक्षित गुंतवणूक आहे. अनेक गुंतवणूक पर्यायांचा विचार करून तुम्ही FD मध्ये पैसे गुंतवता तेव्हा, ते ठराविक वर्षांसाठी ब्लॉक केले जाते. तसेच आणीबाणीच्या किंवा अनपेक्षित खर्चाच्या वेळी मुदत ठेवींची मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढणे हा एक पर्याय आहे.

आजही अनेक लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बँकांमधील मुदत ठेवीत गुंतवणूक करतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर मुदत ठेवीवरील व्याज दरामध्येदेखील वाढ झालीय. सध्याच्या शेअर बाजारामध्ये अनेक घडामोडींमुळे असलेल्या अस्थिर आणि घसरणीमुळे सध्या अनेक जण जोखीममुक्त गुंतवणुकीचा पर्याय बघत आहेत. गुंतवणूक केली की तसेच तुम्हाला पैशांची गरज भासल्यास एफडी मोडतादेखील येते.

Advertisement

जर तुम्हाला Fixed Deposit म्हणजेच एफडी मोडायची असेल तर ज्या बँकेत ती आहे ती बँक तुमच्याकडून काही पॅनल्टी म्हणून विशिष्ट रक्कम घेते. ही रक्कम प्रत्येक बँकेची सारखी नसते. त्याविषयी जाणून घेऊ..

▪️ येस बँक (Yes Bank) ग्राहकांना 5 कोटींहून कमी रक्कमेची एफडी मुदतीपूर्वी काढल्यास तुम्हाला 0.75 टक्के पॅनल्टी आकारली जाईल.

Advertisement

▪️आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार मुदतीपूर्वीच जर एफडी मोडल्यास तुम्हाला 0.50 टक्के पॅनल्टी भरावा लागू शकतो.

▪️ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) एखाद्या व्यक्तीने 5 लाखांपर्यंतची एफडी मुदतीआधीच मोडल्यास एकूण रक्कमेच्या 0.50 टक्के आणि जर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास 1 टक्के तुम्हाला पॅनल्टी भरावी लागेल.

Advertisement

▪️पीएनबी (PNB) खातेदारांनी मुदतीआधीच एफडी मोडल्यास एफडीमधील एकूण रक्कमेच्या 1 टक्का पॅनल्टी म्हणून घेतली जाते.

▪️ॲक्सिस बँकेमध्ये (Axis Bank) एफडी मुदतीआधीच मोडल्यास 1 टक्के पॅनल्टी लागू शकते. पण जर ग्राहकांनी एफडीच्या 25 टक्के रक्कम मुदतीपूर्व काढली तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement