SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल. तुमचा व्यवसाय असेल तर मोठा आर्थिक फायदा संभवतो. हलगर्जीपणा करु नका.

वृषभ (Taurus): नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकला, पैसे येतील.

मिथुन (Gemini) : मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. जवळच्या मित्रांशी वितुष्ट येऊ शकते. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा. ओळखीचा वापर करून घेण्याचा पर्याय सुचवला जाईल. एखादी अमूल्य वस्तू जी हरवली होती ती आज परत मिळेल.

कर्क (Cancer) : जमिनीच्या कामातून चांगला मोबदला मिळेल. कामे तुमचा कस पाहतील. व्यावसायिक लाभातून समाधान मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. दिवस तणावाचा राहील. एखादी बातमी मिळाल्याने आनंदी असाल.

Advertisementसिंह (Leo) : जवळचे नातेवाईक भेटतील. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. तुमच्या खासगी गोष्टींमध्ये लुडबूड झाल्यामुळे दिनचर्येवर परिणाम होईल.

कन्या (Virgo) : कार्यक्षेत्रात सतर्क रहा. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. कामाच्या ठिकाणी आनंद नक्की मिळू शकतो.

तुळ (Libra) : आज झटपट लाभाचा मोह टाळलेलाच बरा. ताकही फुंकून प्यावे असा दिवस. वडीलांशी खटके उडू शकतात. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होतील. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा. एखादी गोष्ट तुम्ही ठरवल्याप्रमाणे होत नसली तरी तुमच्या फायद्याची ठरेल. लवकरच एखादी गोष्ट साजरी कराल.

वृश्‍चिक (Scorpio) : कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पालन करा. आज जे तुमच्या मनात असेल ते सगळं तुम्हाला समोरच्याला सांगता येईलच असं नाही.

Advertisementधनु (Sagittarius) : सामाजिक प्रतिष्ठेचा विचार कराल. सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल. काही तांत्रिक बदल करावे लागतील. आर्थिक कामे वेळेत पार पडतील. आज किंवा उद्या मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

मकर (Capricorn) : कामातील अडचणी दूर कराव्या लागतील. आज मुला-मुलींकडून कौतुकास्पद काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. आईसोबत बाहेर जा म्हणजे कष्ट काय असते समजेल. नवीन संधी मिळेल.

कुंभ (Aquarious) : थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

मीन (Pisces) : जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. लोकांना आज नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीचा उत्साह काही काळापुरता थोडा मागे ठेवा.

Advertisement