SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी, मोदी सरकार करणार ‘या’ शेतमालाची आयात..

देशातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.. देशातील वाढती महागाई लक्षात घेऊन मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. मात्र, त्याचा तूर (Tur) व उडीद पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे..

सध्या देशात तूर व उडदाचा मुबलक साठा असतानाही, मोदी सरकारने दीर्घ कालावधीसाठी या दोन्ही धान्यांची आयात (Import) करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यासाठी मोदी सरकारने म्यानमार, मोझांबिक व मालावी या देशांसोबत तूर आयातीबाबत 5 वर्षांचा करार केला आहे. 2021-22 ते 2025-26 असा या कराराचा कालावधी आहे..

Advertisement

मोदी सरकारने केलेल्या या करारानुसार भारतात दरवर्षी साडेतीन लाख टन तूर व दोन लाख टन उडीद आयात केले जाणार आहे. देशातील वाढती महागाई लक्षात घेऊन डाळीचे दर नियंत्रणात राहावेत, यासाठी मोदी सरकारने हा करार केल्याचे सांगण्यात येते.. मात्र, त्यामुळे यंदा तूर व उडीद पिकाचे दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे..

तुरीचे भाव कोसळणार..

Advertisement

मागील हंगामात तुरीचे उत्पादन कमी झाले, तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नव्हता.. कारण, त्यावेळी केंद्र सरकारने विक्रमी 8 लाख 40 हजार टन तुरीची आयात केली होती. त्यावेळी तुरीला 6300 रुपये हमीभाव होता.. मात्र, व्यापाऱ्यांकडे तेवढाही भाव मिळाला नाही.. यंदा तुरीच्या हमीभावात वाढ करण्यात आली असून, 6700 रुपये क्विंटल दर केला आहे.

दरम्यान, सध्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आलेला आहे.. जूनच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने यंदा पेरण्यांना उशीर झालाय.. त्यात मोदी सरकारने तूर व उडदाची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही पिकांना यंदा कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.. परिणामी, यंदा तुरीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या धोरणामुळे भविष्यात तुरीची लागवड कमी होत जाईल व खाद्यतेलाप्रमाणे तुरीचीही कायम आयातच करण्याची वेळ येईल, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement