SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चार वर्षांत करोडपती..!! ‘एलआयसी’च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

भारतीय आयुर्विमा महामंडळ.. अर्थात एलआयसी.. भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी.. ‘एलआयसी’कडून सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी विविध पाॅलिसी आणल्या जातात.. त्याद्वारे गुंतवणुकीबरोबर नागरिकांच्या भविष्याचीही काळजी ‘एलआयसी’कडून घेतली जात असल्याचे दिसते..

अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत एलआयसीने अनेक योजना लाॅंच केल्या आहेत, ज्यामध्ये नागरिकांना गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.. ‘एलआयसी’ची अशीच एक योजना, म्हणजे ‘जीवन शिरोमणी योजना’… 2017 मध्ये ‘एलआयसी’ने ही योजना (LIC Jeevan Shiromani Plan) सुरु केली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही फक्त 4 वर्षांत करोडपती होऊ शकता. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

जीवन शिरोमणी योजनेबाबत..

‘एलआयसी’ची ही ‘नॉन-लिंक्ड’ योजना आहे. मर्यादित प्रीमियम असणारी ही ‘मनी बॅक’ विमा योजना आहे. त्यात पॉलिसीधारकाला 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी दिली जाते. या योजनेत बचतीसोबतच सुरक्षाही मिळते. किमान एक कोटी रुपयांच्या मूळ विमा रकमेसह ही योजना घ्यावी लागते.

Advertisement

जीवन शिरोमणी योजनेत फक्त 4 वर्षेच गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर लगेच रिटर्न मिळण्यास सुरुवात होते. पॉलिसीधारक वार्षिक, सहामाही, त्रैमासिक व मासिक आधारे प्रीमियम भरू शकतात. पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे. या योजनेत 14, 16, 18 आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

पाॅलिसीचे फायदे

Advertisement
  • जीवन शिरोमणी योजनेत पॉलिसीधारकांना ‘सर्व्हायव्हल बेनिफिट’ही मिळतो.
  • पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ‘नॉमिनी’ला विशिष्ट रक्कम मिळते.
  • पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतरही ‘नॉमिनी’ला एकरकमी पैसे दिले जातात.
  • योजनेत किमान एक वर्ष प्रीमियम भरल्यानंतर कर्जही घेऊ शकता. प्लॅनमध्ये जोडलेल्या अटींनुसार हे कर्ज मिळते.

किती पैसे मिळतात..?

समजा, एखाद्या 29 वर्षीय व्यक्तीने 20 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतल्यास पहिल्या वर्षासाठी दरमहा करासह 61,438 रुपये प्रीमियम भरावा लागेल. दुसऱ्या वर्षापासून दर महिन्याला 60,114.82 रुपये प्रीमियम असेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,34,50,000 रुपये मिळतील..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement