SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध विजय, ‘हा’ खेळाडू ठरला सामन्याचा हिरो..

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (ODI match) टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) 2 गडी राखून विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.

नाणेफेक जिंकत प्रथम वेस्ट इंडीजने फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचे सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्स 35 धावा तर पूरन 74 धावा करून बाद झाला. मग शाय होपने दणकेबाज फटके मारत 115 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजने भारतासमोर 312 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Advertisement

312 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार शिखर धवन 13 धावा, शुभमन गिल 43 धावा, सुर्यकुमार यादव 9 धावा करून बाद झाले. संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी आकर्षक फटकेबाजी सुरू ठेवली. मग अखेर 63 धावा करुन अय्यर बाद झाला आणि संजूने 54 धावा केल्या असता तोही बाद झाला.

आता हाती कमान आलेल्या अक्षर पटेल आणि दीपक हुडाने मात्र संघर्ष सुरू ठेवला होता. दीपक हुडाने 33 धावा केल्या. यानंतर उल्लेखनीय कामगिरी करत बघता बघता 3 चेंडूत 6 धावा आवश्यक असताना षटकार ठोकून अक्षर पटेलने आपलं पहिलं अर्धशतक करून भारताला विजय मिळवून दिला. कालच्या झालेल्या या रोमांचक सामन्यात सामनावीर ठरलेल्या अक्षर पटेलने नाबाद 64 धावांची दमदार खेळी करू 1 विकेट देखील घेऊन अष्टपैलू कामगिरी केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement