SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ..

अभिनेत्री कॅटरिना कैफ (Actress Katrina Kaif) आणि तिचा पती अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिलीय. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रसंगामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेता व अभिनेत्रीला मिळालेल्या धमकीमुळे चित्रपटसृष्टीत धमकीविषयी चर्चेचं वातावरण झालं आहे. बॉलिवूड स्टार कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

Advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती (मात्र तेच त्याचे खरे नाव आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.) अभिनेत्री कतरिनाचा मागील काही दिवसांपासून स्टॉक करत होता आणि ही गोष्ट विकी कौशलने समजूतदारपणे घेऊन त्या व्यक्तीला आधी समजवण्याचा प्रयत्न केला, तरीही तो असे करत राहिला आणि शेवटी विकी कौशलला सांताक्रूझ पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला अजून एक वर्षदेखील झालेलं नाही. अलीकडेच, कतरिनाने लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा केला, जिथे विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कतरिनाचे काही मित्र या वाढदिवसाला उपस्थित होते. वाढदिवसाचे बरेच फोटो सोशल मीडियावरही आले होते. कतरिना आणि विकीला मिळालेल्या धमकी संदर्भातील माहिती सध्या उपलब्ध नसली तरी या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करुन घेण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement