SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टाटा’च्या ‘या’ शेअरची कमाल, गुंतवणुकदारांची झाली चांदी..!!

अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते.. मात्र, आपला पैसा नेमका कुठल्या शेअरवर लावावा, हे समजत नाही.. बऱ्याचदा कोणत्याही माहितीविना स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नंतर पश्चातापाची वेळ येते.. काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share market) मोठी अस्थिरता असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय..

एकीकडे अशी स्थिती असली, तरी काही ‘क्वालिटी’ शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.. त्यापैकीच एक स्टाॅक म्हणजे, ‘टाटा’ समूहाचा ‘टाटा अलक्सी’ (Tata Elxsi) शेअर… भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक.. बहुतेक आयटी शेअर विक्रीच्या दबावाखाली असताना, ‘टाटा’च्या या शेअरने यंदा 42 टक्के परतावा दिलाय..

Advertisement

सातत्याने चांगला परतावा

‘टाटा अलेक्सी’च्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या 9 वर्षांत हा शेअर 102 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढलाय, ज्यामुळे गुंतवणुकदारांना तब्बल 8,100 टक्के परतावा मिळाल्याचे दिसत आहे..

Advertisement

‘टाटा’ समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यांत साधारणपणे 7040 रुपयांवरून 8370 रुपयांपर्यंत वाढलाय. या काळात या शेअरने 19 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी हा शेअर 5890 रुपयांवर होता. तो आता 8370 रुपयांवर (42 टक्के वाढ) गेला आहे.. गेल्या 5 वर्षांत हा स्टॉक सुमारे 875 वरून 8370 रुपये प्रति शेअर पातळीपर्यंत वाढला..

समजा, एखाद्याने एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असतील, तर आज त्याचे 1.075 लाख झाले असते, 6 महिन्यांत ते 1.19 लाख, एक वर्षात 1.95 लाख रुपये झाले असते. एखाद्याने 5 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असल्यास, त्याचे आज 9.60 लाख रुपये झाले असते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement