सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात या आठवड्यात चांगली वाढ झाली. संपूर्ण आठवड्यात सुरुवातीपासून सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले.. शनिवारी (ता. 23) सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीचे दर घसरले होते. तशीच स्थिती आजही (रविवारी) कायम राहिली. (Gold and Silver rate)
सोन्याच्या दरात आज (ता. 24) वाढ झाली असली, तरी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,900 रुपये प्रति तोळा होती. तसेच, 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,160 रुपये प्रति 10 ग्रॅम असल्याचे दिसून आले.. चांदीचा 10 ग्रॅमचा दर 551 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)
- चेन्नई – 51,230 रुपये
- दिल्ली – 50,160 रुपये
- हैदराबाद – 51,160 रुपये
- कोलकत्ता – 51,160 रुपये
- लखनऊ – 51,330 रुपये
- मुंबई – 51,160 रुपये
- नागपूर – 51,190 रुपये
- पुणे – 51,190 रुपये
आठवड्याची स्थिती
‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या (IBJA) मते या आठवड्यात 18 जुलैला सोने 50,629 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. 19 जुलैला त्यात घसरण होऊन हे दर 50,493 पर्यंत खाली आले. 20 जुलैला त्यात आणखी घसरण झाली नि सोन्याचा दर 50,477 रुपयांवर आला.
गुरुवारीही (ता. 21) सोन्याच्या दरात घसरण सुरुच राहिली नि तो 50,182 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. मात्र, शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी दिसली.. सोन्याची किंमत 50,677 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. त्यानंतर शनिवारी व आजही (रविवारी) सोन्याचे भाव चढेच राहिले आहेत..