SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कमी भांडवलावर सुरु ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल बक्कळ कमाई…!!

कोरोना महामारीनंतर आता अनेक जण नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यावरच भर देत आहेत. शिवाय, सध्या नोकरी मिळणंही अवघड झालंय.. अशा वेळी स्वत:चा छोटा का असेना, पण बिझनेस सुरु करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.. त्यासाठी सरकारही प्रोत्साहन देत आहे..

गेल्या काही वर्षात सौंदर्य उत्पादनं व ब्युटी पार्लरची (Beauty Parlour) बाजारपेठ झपाट्यानं वाढलीय. अगदी खेडोपाडी ‘ब्युटी पार्लर’चे बोर्ड दिसत आहेत. लग्नसोहळा असो वा इतर सण-उत्सव.. अनेक महिला ‘ब्युटी पार्लर’चे दार ठोठावतातच.. त्यामुळे हा व्यवसाय झपाट्यानं वाढतोय..

Advertisement

महिला असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं, असं वाटतं. त्यामुळे या व्यवसायात सध्या तरी अनेक संधी उपलब्ध आहेत. हा व्यवसाय सुरु कसा करायचा, त्यासाठी किती खर्च येईल नि त्यातून किती कमाई होऊ शकते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

‘ब्युटी पार्लर’ व्यवसायाबाबत…

Advertisement

किती भांडवल लागेल
‘ब्युटी पार्लर’चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 3 लाख रुपयांचे भांडवल लागेल. त्यात यंत्रसामग्री, उपकरणे, खुर्च्या, आरसे, फर्निचर या गोष्टींवर 2 लाख रुपये खर्च येईल.. इतर गोष्टींसाठी काही पैसे लागतील.. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेतून या व्यवसायासाठी कर्जही मिळू शकते..

ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योगासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज मिळतं.. बँकेनुसार कर्जाचे व्याजदर वेगवेगळे असू शकतात. या योजनेअंतर्गत साधारण वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर आहे. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, व्याजदरही माफ होतो. महत्वाचं म्हणजे, शहरात ‘ब्युटी पार्लर’ व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला महापालिकेचा व्यवसाय परवाना, जीएसटी क्रमांक घ्यावा लागेल.

Advertisement

किती कमाई होईल..?
‘ब्युटी पार्लर’मधून चांगली कमाई होण्यासाठी सर्वप्रथम तुमचे ग्राहक ओळखा. तुमच्या भागात किती लोकसंख्या आहे, त्यांचा आर्थिक स्तर कसा आहे, हे जाणून घ्या.. त्यानुसार, पार्लरमध्ये कोणते उत्पादन वापरायचं हे ठरवा. तुम्ही ग्राहकांना कशी सेवा देता, यावर तुमची कमाई अवलंबून असणार आहे.

सुरुवातीच्या काळात कमाईऐवजी गुणवत्तेवर लक्ष द्या.. पार्लरमध्ये व्यावसायिक कामगार ठेवल्यास ते गरजेनुसार ग्राहकांना योग्य सल्लाही देऊ शकतील. हा व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर ग्राहक सेवेत तडजोड करु नका. तुमच्या वागण्या-बोलण्यावरच या व्यवसायाचे यश अवलंबून आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement