SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राष्ट्रपतींचे अधिकार काय? लाखोंच्या पगारासह मिळणार ‘या’ मोफत सुविधा..

भारतात राष्ट्रपती (President of India) निवडण्यासाठी 18 जुलैला मतदान प्रक्रिया पार पडली. याशिवाय गुरुवारी (ता. 21) मतमोजणी होऊन द्रौपदी मुर्मू या निवडून आल्यानंतर एनडीएच्या विजयी उमेदवार द्रौपदी मुर्मू या भारताच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे तर 25 जुलैला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपतींचे अधिकार:

Advertisement

▪️ राष्ट्रपतींची मुख्य जबाबदारी म्हणजे पंतप्रधानांची नियुक्ती आणि संविधानाचे रक्षण करणे. त्यांच्या मंजुरीशिवाय कोणतेही विधेयक मंजूर होत नाही.

▪️ राष्ट्रपती कलम 356 चा वापर करून समजा भारतातील कोणत्याही राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरली असेल तर तिथे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.

Advertisement

▪️ राष्ट्रपती धन विधेयक वगळता कोणतेही विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यांचे सर्वोच्च कमांडर असतात.

▪️ भारतात जर युद्ध किंवा शत्रूकडून बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी झाली तर कलम 352 अन्वये राष्ट्रपती देशात कधीही आणीबाणी घोषित करू शकतात.

Advertisement

▪️ भारतातील कोणत्याही राज्यात आर्थिक संकट आलं तर राष्ट्रपती कलम 360 नुसार तिथे आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात.

▪️ भारताचे राष्ट्रपती कलम 72 अन्वये एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी असलेल्या व्यक्तीची शिक्षा माफ करू शकतात, निलंबित करू शकतात किंवा कमी करू शकतात. याशिवाय जर कोणाला फाशीची शिक्षा झाली असेल तर अशा दोषींबाबतही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असतो.

Advertisement

▪️ राष्ट्रपती यांच्याकडे भारताचे सरन्यायाधीश, राज्यपाल, निवडणूक आयुक्त, राजदूत व राज्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे.

▪️ राष्ट्रपती कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती करतात. एवढंच नव्हे तर सर्व आंतरराष्ट्रीय करार आणि करार राष्ट्रपतींच्या नावावर आहेत.

Advertisement

▪️ अति महत्वाचं म्हणजे आपल्या कानावर हल्ली अनेक विधेयकांची चर्चा येत असते. असे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच कायदा बनत असते किंवा त्यांच्या इच्छेनुसार ते काही काळ थांबवू शकतात किंवा फेरविचारासाठी पुन्हा पाठवूदेखील शकतात. जर संसदेने दुसऱ्यांदा विधेयक मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करावी लागते.

▪️ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर करतात. राष्ट्रपती मंत्रिपरिषदेला सल्ल्याचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतात. पण तोच सल्ला पुन्हा मिळाल्यास राष्ट्रपतींनी त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.

Advertisement

राष्ट्रपतींना पगार आणि सुविधा किती मिळतात?

भारतात 2018 सालापर्यंत राष्ट्रपतींना दरमहा 1.50 लाख रुपये पगार मिळत होता. परंतु, 2018 मध्ये पगार वाढवून 5 लाख रुपये झाला. याशिवाय राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय, टेलिफोन बिल, घर, वीज यासह इतर अनेक भत्तेदेखील मिळत असतात. राष्ट्रपतींना प्रवासासाठी मर्सिडीज-बेंझ एस 600 पुलमन गार्ड कार मिळते. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 86 विशेष अंगरक्षक असतात.

Advertisement

राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर त्यांना अर्ध्या पगाराची म्हणजे अडीच लाख रुपये पेन्शन मिळते. यासोबतच एक बंगला (त्याचे भाडे आकारले जात नाही), दोन मोबाईल फोन आणि आजीवन मोफत उपचार अशा सुविधा मिळतात. माजी राष्ट्रपतींना सहाय्यकासोबत रेल्वे किंवा विमानाने प्रवास करण्याची सुविधासुद्धा मिळते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 http://play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement