SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): स्वत:त काही जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. अचानक काही खर्च सामोरे येतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. बोलताना शब्दांचे भान ठेवावे. मत्सराला बळी पडू नका. अनेक समस्यांचे निराकरण होईल. धन आगमन होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

वृषभ (Taurus): नियोजनबद्ध कामे करावीत. कष्टाला मागेपुढे पाहू नका. वडीलधार्‍या व्यक्ति तुमच्यावर नाराज होऊ शकतात. प्रवासात मनस्ताप वाढू शकतो. नियमांचे काटेकोरपणे पालन कराल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

Advertisement

मिथुन (Gemini) : थोडेसे मनाविरुद्ध वागावे लागू शकते. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. कामात मोठे बदल करण्याचा विचार करू नये. जवळच्या मित्रांशी दुरावा वाढू शकतो. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कर्क (Cancer) : मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धैर्याने नवीन कामाला सामोरे जा. जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळा. व्यवसायात मोठे यश मिळेल. मीडिया तसेच आयटीशी संबंधित व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट असतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

सिंह (Leo) : उगाच कोणाशीही शत्रुत्व पत्करू नका. अपचनाचा त्रास वाढू शकतो. कापणे, भाजणे यांसारखे किरकोळ त्रास संभवतात. परिस्थितीला नांवे ठेवू नका. शांतता व संयम बाळगावा. मीडिया तसेच आयटी क्षेत्रातील व्यक्तींना हा दिवस यशदायी ठरणार आहे. राजकारणात या व्यक्ती आपल्या उच्च नेत्यांना कामाने खुश करतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. आरोग्य चांगले राहील. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

कन्या (Virgo) : कामात काही अनपेक्षित बदल घडून येतील. घरातील गोष्टींमध्ये विशेष लक्ष घाला. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. कामातील अडचणी दूर कराव्या लागतील. एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Advertisement

तुळ (Libra) : हाताखालील लोकांकडे बारीक लक्ष द्यावे. कामाचा ताण अधिक जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक वृद्धीचा लाभ उठवावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धावपळीचा दिवस आहे. एखाद्या नव्या व्यवसायाबाबत योजना आखाल. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अशक्तपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

वृश्‍चिक (Scorpio) : जवळचा प्रवास टाळलेलाच बरा. भावंडांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. नसते साहस महागात पडू शकते. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा लागेल. भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळखी होतील. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.

Advertisement

धनु (Sagittarius) : प्रिय व्यक्तीशी दुरावा वाढू शकतो. भागीदाराशी समजुतीने घ्यावे. अपचनाचा त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. निर्णय घेताना काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. राजकीय व्यक्तींना विशेष लाभ होतील. लव्ह लाईफ चांगली राहील. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल.

मकर (Capricorn) : जवळच्या मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीवर मात करता येईल. उष्णतेचा विकार बळावू शकतो. पित्त प्रकृती असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. व्यापारात मोठी प्रगती होईल. अनेक लाभ होतील. हातात पैसा खेळता राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या वादात पडू नका. आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका.

Advertisement

कुंभ (Aquarious) : किरकोळ दुखापत संभवते. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करेल. थोरांचे वेळेवर मार्गदर्शन घ्यावे. आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. घराबाहेर वावरतांना सतर्क राहावे. विद्यार्थी त्यांच्या कामात यशस्वी ठरतील. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. लव्ह लाईफमध्ये विवाहाचा प्रस्ताव ठेवाल. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

मीन (Pisces) : प्रेमप्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. रेस जुगारातून नुकसान संभवते. चोरांपासून सावध राहावे. मानसिक ताण काहीसा वाढू शकतो. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. एखाद्या कामामध्ये तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. प्रसन्नता वाढवणारा दिवस असेल. धन आगमनाची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली असेल. दाम्पत्य जीवनात रागावर नियंत्रण ठेवा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा.

Advertisement